सचिन तेंडुलकर, डेल स्टेन (Photo Credit: Getty)

भारत (India)-दक्षिण आफ्रिका (South Africa) मधील 2010 वनडे सामन्यात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिकासिक पहिले दुहेरी शतक ठोकले. ग्वाल्हेरच्या मैदानावर सचिनने 147 चेंडूत 200 धावा करून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध इतिहास रचला. त्यावेळी सचिन आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक करणारा पहिला फलंदाज बनला होता. 25 चौकार आणि 3 षटकारांनी भरलेल्या त्याच्या शानदार खेळीच्या वेळी सचिनने दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn), वेन पार्नेल असो किंवा जॅक कॅलिस, दक्षिण आफ्रिकेचा कोणताही गोलंदाजाला सचिनला रोखण्यात अपयशी ठरला. आज, दहा वर्षांनंतर स्टेनने सचिनच्या त्या खेळीविषयी मोठा खुलासा केला आहे. स्टेनने आपल्या निवेदनात म्हटले की सचिन प्रत्यक्षात 190 धावांवर बाद झाला होता परंतु भारतीय चाहत्यांच्या भीतीमुळे अंपायरने त्याला आऊट दिले नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनशी झालेल्या संभाषणावेळी स्टेनने हे वाक्य स्पष्ट केले आणि म्हणाला की, सचिनने जेव्हा 190 धावा करून खेळत होता तेव्हा त्याने सचिनला एक उत्तम चेंडू टाकला ज्याला खेळू शकला नाही. (VIDEO: जेव्हा सचिन तेंडुलकर ने आपल्या बॉलिंगच्या जादूने टॉम मूडी, ब्रायन लारा, इंझमाम सारख्या दिग्गजांची उडवली विकेट)

स्टेनने अंपायरकडे पाहून एलबीडब्ल्यूचा इशारा केला, पण अंपायर इयान गूल्डने (Ian Gould) त्याचे अपील फेटाळून लावले. जेव्हा स्टेनने अंपायरला सचिनला आऊट का नाही दिले, असे विचारले तेव्हा स्टेडियम भारतीय चाहत्यांनी भरलेला आहे आणि सचिनला आऊट दिले तर तो पुन्हा हॉटेलमध्ये परत जाऊ शकणार नाही, असे गूल्डने उत्तर दिले. स्टॅनने अँडरसनला सांगितले की, 'ग्वाल्हेरमध्ये सचिनने आमच्याविरुद्ध वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले होते आणि मला आठवते, मला वाटते की जेव्हा तो 190 धावांच्या आसपास होता तेव्हा तो एलबीडब्ल्यू आऊट होता. इयान गूल्ड हे त्या सामन्यात अंपायर होते आणि त्यांनी सचिनला नाबाद नाही असे म्हटले.

Yuvraj Singh ने दिलेले चॅलेंज Sachin Tendulkar ने अस केले पूर्ण ; पाहा मजेदार व्हिडिओ - Watch Video

सचिनने 1989 मध्ये 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2013 मध्ये निवृत्त होईपर्यंत सचिनने 200 कसोटी सामन्यांत 34,357, 463 एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा केल्या आहेत. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेच्या विजयासाठी तो भारताचा अग्रणी धावा करणारा फलंदाज होता. शिवाय, सचिनने निवृत्त होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी 100 शतकं ठोकले.