IND vs ZIM 1st T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शनिवारी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेने भारतीय संघाचा 13 धावांनी पराभव केला आहे. तत्तपुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या झिम्बाब्वेने भारतासमोर 116 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक चार विकेट घेतल्या तर दुसरीकडे, झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने सर्वाधिक 23 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडिया 102 धावावंर गारद झाली आणि झिम्बाब्वेने 13 धावांनी सामना जिंकला. टीम इंडियाकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 31 धावा केल्या. झिम्बाब्वेसाठी कर्णधार सिकंदर रझाने सर्वाधिक तीन बळी घेतले. टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी-20 सामना उद्या हरारे येथे संध्याकाळी 4.30 वाजता खेळवला जाणार आहे.
1ST T20I. WICKET! 19.5: Washington Sundar 27(34) ct Blessing Muzarabani b Tendai Chatara, India 102 all out https://t.co/r08h7yglxm #ZIMvIND
— BCCI (@BCCI) July 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)