उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्या खास शैलीत आपल्याच पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना चिमटे काढतात. अलिकडे ते बरेचसे जपून बोलत असले तरी आपली नर्मविनोदशैली त्यांनी कायम ठेवली आहे. या वेळी औरंगाबद येथे बोलताना आमदार विक्रम काळे यांच्यावर त्यांनी चांगलीच टोलेबाजी केली. साहेबांसमोर सांगतो (शरद पवार) मला तर विक्रम काळेची भीतीच वाटते. एकदा तर त्यांनी थेट मला मंत्री करा अशीच मागणी केली. त्यामुळे मी तर त्याच्याकडे येताना दबकतच येतो, असे अजित पवार यांनी म्हटले. पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)