UNESCO World Heritage Site: आसाममधील राजघराण्याच्या दफनभूमीचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. ही भारतासाठी मोठी उपलब्धी असल्याचे केंद्राने म्हटले आहे. जागतिक वारसा समितीने शुक्रवारी, आसामच्या चराईदेव मोईदामचा (Charaideo Maidam) युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्याची घोषणा केली. हे भारतामधील 43 वे जागतिक वारसा स्थळ बाहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. भारतासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे मोदी म्हणाले. चराईदेव येथील मोईदाम गौरवशाली अहोम संस्कृतीचे दर्शन घडवतात, जे पूर्वजांसाठी अत्यंत पूजनीय होते असे मोदी म्हणाले. आजपर्यंत, जागतिक वारसा समितीने 168 देशांमधील 1,199 स्थळांचा वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भारताच्या 43 साइट्स आहेत.
अहोम समुदायासाठी चराईदेव मोईदाम ही अतिशय पवित्र वास्तू आहे. हे अहोम शासक किंवा प्रतिष्ठित व्यक्तीचे विश्रामस्थान मानले जाते. त्यांचे अवशेष तसेच मौल्यवान कलाकृती आणि खजिना येथे जतन केला आहे. आसामच्या ब्रह्मपुत्रा खोऱ्यात 1228 साली स्थापन झालेल्या अहोम राज्याने 600 वर्षे आपले सार्वभौमत्व कायम ठेवले. चराईदेव मोईदाम येथे मृतांचे अवशेष भूमिगत चेंबरमध्ये पुरले आहेत. त्यावर एक स्मारक बांधण्यात आले आहे. चराईदेव मोईदामला आसामचा पिरॅमिड असेही म्हणतात. जवळजवळ 700 वर्षे जुनी ही दफन प्रणाली आहे.
पहा पोस्ट-
🔴 BREAKING!
New inscription on the @UNESCO #WorldHeritage List: Moidams – the Mound-Burial System of the Ahom Dynasty, #India 🇮🇳.
➡️https://t.co/FfOspAHOlX #46WHC pic.twitter.com/H3NU2AdtIq
— UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳 (@UNESCO) July 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)