Tiger's Hunt Viral Video: जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये वाघाने केली शिकार, व्हिडिओ व्हायरल
Tiger | (Photo Credit - X)

Tiger's Spectacular Hunt: शिकार करणाऱ्या एका वाघाचा व्हिडिओ (Tiger Viral Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात असलेल्या प्रख्यात जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये (Jim Corbett National Park) कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. या व्हिडिओचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये वाघाच्या घाणेंद्रियाची तीव्र शक्ती लक्षात येते. जी केवळ वासावरुन आपले सावज ओळखण्यास त्याला मदत करते. व्हिडिओत पाहायला मिळते की, माळराण असलेल्या प्रदेशातून जात असताना गवतात लपलेले सावज वाघ केवळ नकात आलेल्या गंधातून ओळखतो.

वाघाच्या घाणेंद्रियाची ताकद

वरिष्ठ आयएएस अधिकारी संजय कुमार यांनी हा व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, एक वाघ गवताळ भागातून निघाला आहे. हा वाघ अगदी आरामात चालला आहे. तो शिकारीच्या शोधात असल्याचे दिसते पण हेही लक्षात येते की, इतक्यात शिकार आपल्या टप्प्यात नाही हेही वाघाला चांगलेच ठाऊक आहे. असे असतानाच त्याला गवतामध्ये अचानक वास येतो आणि तो थबकतो. तो गवतात थोडासा काहीतरी शोधतो आणि पुढच्या काहीच क्षणामध्ये शिकार त्याच्या हाती लागते. ही शिकार पकडण्यासाठी तो विशेष काहीच कष्ट घेत नाही. केवळ वासावरुन ती शिकार त्याला सापडते हे विशेष. (हेही वाचा, Viral Video: हत्तीला पाहून शिकारी वाघाची अवस्था बिघडली, हत्तीला पाहून लपला झुडपात (पाहा व्हायरल व्हिडिओ))

जंगलात लपाछपीचा खेळ

आयएएस अधिकारी संजय कुमार शेअर केलेल्या व्हिडिओसबतच्या पोस्टमध्ये म्हणतात, "अशा वन्यप्राण्यांच्या भेटीमुळे निसर्गातील लपाछपीचा कायमचा खेळ अधोरेखित होतो. शिकार आपल्या शिकारीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. पण सर्वोच्च शिकारी शिकार करुन पर्यावरणीय समतोल राखतात. येथे, एक वाघ ढिकाला, जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील टायगर रिझर्व्हच्या गवतांमध्ये लपलेले सावज शोधून त्याच्या घाणेंद्रियाचे कौशल्य दाखवतो.” व्हिडिओ पाहून एका एक्स वापरकर्त्याने वाघाच्या चपळाईचे कौतुक करत असे म्हटले आहे की, " हे दृश्य किती भव्य आहे! वाघाला द्याच्या घाणेंद्रियामुळे शिकार करणे सहज शक्य झाले आहे. वाघ छोटा असो की मोठा शिकार करणे त्याला सहज शक्य आहे. (हेही वाचा, Tiger Spotted Standing on Wall in UP Video: पिलीभीती येथे जंगली वाघाचा निवासी वस्तीत फेरफटका, नागरिकामध्ये घबराट)

व्हिडिओ

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाविषयी

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यातील एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान 1936 मध्ये हेली नॅशनल पार्क म्हणून स्थापित केले गेले. पुढे 1956 मध्ये त्याचे शिकारी आणि निसर्गवादी जिम कॉर्बेट यांच्या नावावरुन कॉर्बेट नॅशनल पार्क असे नामकरण करण्यात आले. हे उद्यान वाघांच्या मोठ्या संख्येसाठी ओळखले जाते. या उद्यानामध्ये भारतीय हत्ती, बिबट्या, आळशी अस्वल, हरिण आणि पक्ष्यांच्या 600 हून अधिक प्रजातींसह विविध वनस्पती आणि प्राणी आहेत. मात्र, त्यातही वाघांची संख्या अधिक आहे.