Viral Video: बुधवारी देहराडूनचे जिल्हा दंडाधिकारी आयएएस सविन बन्सल यांनी ओल्ड मसुरी रोडवर असलेल्या एका दारूच्या दुकानाला भेट दिली, जिथे त्यांना दुकानातील कर्मचारी बाटल्यांवर २० रुपये जास्त आकारत असल्याची माहिती मिळाली. ग्राहक असल्याचे भासवत त्यांनी दुकानात जाऊन दारूची बाटली मागितली असता दारुच्या बाटल्या 660 रुपये असतानाही त्या 680 रुपयांना दिल्या जातील, असे सांगण्यात आले. दुकानाकडून आकारण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्काची दखल घेत डीएमने दुकानाविरुद्ध 50,000 रुपयांचे चलन जारी केले. दारूसाठी रांगेत उभे राहून नंतर जादा दराने बाटल्या विकणे ही वाईट प्रथा उघड करणारा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे. व्हिडीओमध्ये बन्सल हे आधी ग्राहक म्हणून दारुची बाटली मागताना दिसत आहेत, मात्र नंतर त्यांना बाटलीवरील अतिरिक्त शुल्काबाबत सांगण्यात आले आहे. हे देखील वाचा: Senior Citizens Mumbai: मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा
येथे पाहा, व्हायरल व्हिडीओ
शराब के ठेके पर अचानक देहरादून के DM पहुँचे देखे फिर क्या हुआ?
इस बार देहरादून वालों क़ो DM गजब मिला हैं, ओवर रेटिंग जाँचने के लिए खुद पहुंच गए ठेके पर, दुकानदारों क़ो पता चला तो होश हो गए फाकता
जिलाधिकारी सविन बंसल के निर्देश पर देहरादून में शराब की दुकानों अपर जिलाधिकारी… pic.twitter.com/bw0ezjPLXI
— Pyara Uttarakhand प्यारा उत्तराखंड (@PyaraUKofficial) September 18, 2024
डीएम दुकानात शिरताना, खाती तपासताना आणि तिथे ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांची तपासणी करताना दिसून येत आहे. दुकानात तपासणीसाठी आलेला अधिकारी म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली तेव्हा इतर ग्राहक प्रभावित झाले.
दुकानदारांनी स्वत: अधिकाऱ्याला जादा दराने दारू विकण्याचा प्रयत्न केल्याचे समजल्यावर त्यांची अवस्था पाहून ते हसले, पण नंतर त्यांना पकडले गेले आणि आवश्यक कारवाईला सामोरे जावे लागले.
जास्त किमतीत दारूच्या बाटल्या देण्याव्यतिरिक्त, आयएएस अधिकाऱ्याने असेही सांगितले की दुकान उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेबद्दल कोणतीही माहिती नव्हती आणि कर्मचाऱ्यांकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते.