(Photo Credits Twitter)

Bhimtal Bus Accident: उत्तराखंडमधील भीमतालमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत पडून भीमतालजवळ हा अपघात झाला असून, यात अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलीस आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना दरीत बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. स्थानिक लोकही मदतकार्यात मदत करत आहेत. अपघातानंतरचा व्हिडिओही समोर आला आहे. बस खोल दरीत  पडल्याचे व्हिडिओत दिसत असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

भीमतालजवळ प्रवाशांनी भरलेली बस दरीत पडली

अपघाताच्या कारणाचा तपास सुरू 

पोलिसांनी अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार बसचा तोल गेल्याने हा अपघात झाला असावा, मात्र या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळण्यास वेळ लागेल. प्रशासनाने इतर वाहनांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.