PIB Fact Check (Photo Credits: Instagram/PIB)

सध्या देशात वेगाने पसरत असलेली कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र आहे. परंतु, अशा परिस्थितीतही खोट्या आणि फसव्या बातम्या सोशल मीडियावर झपाट्याने पसरत आहे. कोविड-19 (Covid-19) वर घरगुती उपाय किंवा कोरोना व्हायरस विरुद्धचे औषध अशा नावाने फेक बातम्या सोशल मीडियावर दिसून येत आहेत. 24 तासांत कोविड-19 बरा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच ऑक्सिजनची गरज असणाऱ्यांना देखील दोन तासांत मदत मिळणार, असा यात दावा केला आहे. पीआयबीने या मागिल तथ्य तपासले असून हा व्हिडिओ फेक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या अचून माहितीसाठी आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला दिला आहे.

या व्हिडिओमध्ये एक माणूस त्याच्याकडे कोरोनाबाधित व्यक्तींना बरे करण्याचे औषध असल्याचा दावा केला आहे. त्याने दिलेल्या औषधापासून जोपर्यंत माणूस बरा होत नाही तोपर्यंत रुग्णाकडून कोणत्याही प्रकारचे फी घेणार नाही असे यात म्हटले आहे. जगभरातील शास्त्रज्ञांना कोरोना व्हायरस विरुद्ध कोणत्याही प्रकारचे औषध अद्याप सापडलेले नाही. त्यामुळे साहजिकच या व्हिडिओमधील सर्व माहिती खोटे आहे.

Fact Check by PIB:

 

View this post on Instagram

 

A post shared by PIB Fact Check (@pibfactcheck)

(Fact Check: कच्चा कांदा आणि सैंधव मीठाच्या सेवनाने कोविड-19 होईल बरा? जाणून घ्या PIB चा खुलासा)

कोरोना व्हायरस विरुद्धचे घरगुती उपाय देखील फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया माध्यमांत दिसून येत आहेत. लाल कांदे, सैंधव मीठ, जिरं, बडीशेप यांसारख्या विविध घरगुती पदार्थांमुळे देखील कोरोना बरा होते, असे अनेक मेसेजेस पाहायला मिळतात. परंतु, यामध्ये कोणतेही तथ्य नसून अशा मेसेजवर कोणीही विश्वास ठेऊ नये. पीआयबी या कोविड-19 संकटादरम्यान अनेक फॅक्ट चेक केले असून खोट्या मेसेजेच आणि व्हिडिओंविषयी जनतेला जागरुक करण्याचे काम केले आहे. दरम्यान, WHO ने दिलेल्या माहितीनुसार कोविड-19 वर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही.