Fact Check: कच्चा कांदा आणि सैंधव मीठाच्या सेवनाने कोविड-19 होईल बरा? जाणून घ्या PIB चा खुलासा
PIB Fact Check Tweet (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) देशभरात धुमाकूळ घालत आहे. यात आता फेक न्यूजला (Fake News) देखील उधाण आले आहे. सध्य़ा व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक (Facebook) वरुन एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. त्यात कच्चा कांदा (Raw Red Onions) आणि सैंधव मीठ (Pink Salt) खाल्याने कोरोना संसर्ग बरा होतो, असा दावा करण्यात आला आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) यामागील सत्याची पडताळणी केली असून तथ्य ट्विटद्वारे लोकांसमोर मांडले आहे.

"सैंधव मीठ सोबत कच्चा कांदा सोलून खाल्याने 15 मिनिटांत तुम्ही कोरोना पॉझिटीव्ह पासून निगेटीव्ह व्हाल. हे एकदम सत्य आहे. तुम्ही स्वत: करुन पहा. कोरोना असो किंवा नसो पण कच्चा कांदा सैंधव मीठासोबत रोज खाल्याने व्हायरस गळ्यात मरुन जातो. तुम्ही याचा फरक जाणवल्यास सगळ्यांसोबत जरुर शेअर करा", असे या व्हायरल मेसेज मध्ये म्हटले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट आणि ऑडिओ क्लिप फेक असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. हा दावा खोटा असून कच्चा कांदा आणि सैंधव मीठ खाल्याने कोविड-19 वर परिणाम होता याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे.

Fact Check By PIB:

त्याचबरोबर भारतीय वैज्ञानिक डॉक्टर एस कृष्णास्वामी (Dr. S. Krishnaswamy) यांनी हा दावा निराधार असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या उपायांबद्दल अद्याप पृष्टी करण्यात आलेली नाही. परंतु, सुरक्षिततेचा खोटा दावा करत हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. (Fake News कशा ओळखाल? COVID-19 Pandemic मध्ये चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी)

सोशल मीडियावरील हा दावा खोटा असल्याने यावर विश्वास ठेऊ नये. तसंच यांसारख्या अनेक फेक न्यूज व्हायरल होत असतात. त्यावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्यामागील सत्य जाणून घेणे गरजेचे आहे. दरम्यान, सध्याच्या काळात कोविड-19 पासून सुरक्षित राहण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणजे मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग, हात धुणे आणि सरकारी नियमांचे पालन करणे.