Fact Check (Photo Credit: PIB)

सोशल मीडियावर (Social Media) सध्या चुकीच्या माहितीचा (Fake News) प्रसार वाढला आहे. विशेषत: सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या (Central Government) योजनांविषयी विविध दावे करणाऱ्या बातम्या व्हायरल होत आहेत. याचपार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पंतप्रधान रामबान सुरक्षा योजनेंबाबत अशीच एक बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. केंद्र सरकार पंतप्रधान रामबान सुरक्षा योजनेंतर्गत सर्व तरूणांना कोरोनाच्या मोफत उपचारासाठी 4000 हजार रुपये दिली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या व्हायरल बातमीमागील सत्य समोर आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मॅसेजमध्ये असे सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान रामबान सुरक्षा योजनेतंर्गत तरूणांना कोरोनाच्या मोफत उपचारासाठी 4000 हजार रुपये दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करा, असे मॅसेज व्हॉट्सअपवर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणारी बातमी खोटी असून अशी कोणतीच योजना केंद्र सरकार चालवत नाही. या बनावट वेबसाइटवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असेही आवाहन पीआयबीने केले आहे. हे देखील वाचा- Fact Check: भारतीय पासपोर्टमधून राष्ट्रीयत्वाचा कॉलम काढण्यात आलाय? PIB ने केला सत्याचा खुलासा

ट्वीट-

यापूर्वी देखील विविध प्रकारच्या फेक न्यूज समोर आल्या आहेत. यातून होणारी दिशाभूल आणि फसवणूक टाळण्यासाठी तथ्य तपासणीशिवाय सोशल मीडियावरील कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही मेसेज पाहिल्या किंवा वाचल्यावर त्यामागील सत्य जाणून घेतल्याशिवाय त्यावर विश्वासही ठेवू नका आणि तो फॉरवर्ड करणेही टाळा.