Vasuki Indicus: गुजरातमध्ये शास्त्रज्ञांना सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; 50 फूट लांब होता 'वासुकी' साप
Vasuki Indicus (PC - X/@iitroorkee)

Vasuki Indicus: गुजरात (Gujarat) मधील कच्छमध्ये अतिशय प्राचीन जीवाश्म सापडले आहेत. हे जीवाश्म वासुकी सापाचे (Vasuki Snake) आहेत. हा जगातील सर्वात मोठा साप (World's Largest Snake) होता. यापेक्षा ॲनाकोंडाही लहान आहे. तसेच डायनासोरच्या युगातील राक्षस T.Rex डायनासोर नव्हता. कच्छच्या पणंधरो लाइटनाइट खाणीत वासुकी नागाचे जीवाश्म सापडले आहेत. हा तोच साप आहे ज्याचा समुद्रमंथनात उल्लेख आहे. त्याच्या साहाय्याने मंदार पर्वत मंथनासारखा फिरवला गेला. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी समुद्रातून बाहेर आल्या. या खाणीतून वैज्ञानिकांनी वासुकी नागाच्या पाठीच्या हाडांचे 27 भाग गोळा केले आहेत. वासुकीचे शास्त्रीय नाव वासुकी इंडिकस असं आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, त्याचा आकार आजच्या अजगरांसारखा विशाल होता. सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, आयआयटी रुरकीचे जीवाश्मशास्त्रज्ञ देबजीत दत्ता यांनी सांगितले की, या जीवाश्माचा आकार वासुकी नाग असल्याचे सूचित करतो. ॲनाकोंडा आणि अजगर प्रमाणे तो आपल्या भक्ष्याला दाबून मारायचा. पण जेव्हा जागतिक पातळीवर तापमान वाढू लागले तेव्हा त्यांची लोकसंख्या कमी होऊ लागली. असे मानले जाते की. त्यांची सामान्य लांबी 36 ते 49 फूट होती. तसेच त्यांचे वजन सुमारे 1000 किलो होते. (हेही वाचा, New Species of Anaconda: ग्रीन ॲनाकोंडा, ॲमेझॉनच्या जंगलात आढळली जगातील सर्वात मोठ्या सापाची प्रजाती)

वासुकी नाग हा हिंदू भगवान शिवाचा साप असल्याचे म्हटले जाते. त्याला सापांचा राजा म्हटले जायचे. हा प्रागैतिहासिक साप टिटानोबोव्हाचा विरोधक मानला जातो. 2009 मध्ये कोलंबियातील कोळशाच्या खाणीत टायटॅनोबोआचे जीवाश्म सापडले होते. त्याची उंची सुमारे 42 फूट होती. वजन सुमारे 1100 किलो होते. हा साप 5.80-6.00 कोटी वर्षांपूर्वी सापडला होता. (हेही वाचा - World's Largest Snake Found Dead: ॲना ज्युलिया नावाचा जगातील सर्वात मोठा साप Amazon Rainforest मध्ये मृतावस्थेत सापडला)

दरम्यान, आयआयटी रुरकी येथील प्राध्यापक आणि या सापाचा शोध घेणाऱ्या टीमचे सदस्य सुनील बाजपेयी यांनी सांगितले की, वासुकीच्या आकाराची तुलना टायटानोबोआशी केली जाऊ शकते. पण दोघांच्या पाठीच्या हाडांमध्ये फरक होता. वासुकी आकाराने टायटॅनोबोआपेक्षा मोठा होता असे आत्ताच म्हणणे योग्य ठरणार नाही. (हेही वाचा, Viral Video: बर्फातून तयार केला विशाल अॅनाकोंडा, व्हिडिओ पाहून साप खरा की खोटा यावर विश्वास बसणार नाही)

वासुकीच्या कवटीचा शोध सुरू -

हा साप सेनोझोइक युगात राहत होता. तेव्हा डायनासोर युग संपुष्टात आले होते. वासुकी नागाच्या पाठीच्या हाडांचा सर्वात मोठा भाग साडेचार इंच रुंद आहे. यावरून वासुकी नागाचे शरीर किमान 17 इंच रुंद असल्याचे दिसून येते. त्याची कवटी सध्या सापडलेली नसून त्याचा शोध सुरू आहे. तथापी, वासुकी नागा काय खात असेल याचा शोध अद्याप शास्त्रज्ञांना लागलेला नाही. पण त्याचा आकार पाहता तो त्या काळातील महाकाय मगरी खात असावा असा अंदाज बांधला जात आहे. या ठिकाणी जवळपास अनेक मगरी आणि कासवांचे जीवाश्मही सापडले आहेत. तसेच दोन प्रागैतिहासिक व्हेलचे जीवाश्मही सापडले आहेत.