National Hangover Day 2020 Funny Memes: नवीन वर्षाच्या पार्टीनंतर तुमचीही अशीच अवस्था झाली आहे? हँगओव्हर उतरताना मनोरंजन करतील हे मीम्स आणि फोटोज
Hangover memes (Photo Credits: Instagram)

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! काल सरत्या वर्षाला निरोप देत, नवीन वर्षाचे स्वागत झाले. संपूर्ण जगभरात यासाठी पार्ट्या झाल्या असतील, मद्यपान झाले असेल. तुम्हालाही काल रात्रीच्या पार्टीमुळे अजूनही चक्कर येत आहे? डोके अजूनही गरगरत आहे? हे सर्व होत असेल तर तसेच असू द्या, कारण तुम्ही आहात राष्ट्रीय हँगओव्हर डेच्या (National Hangover Day 2020) मूडमध्ये.

दरवर्षी, जानेवारीचा पहिला दिवस हा राष्ट्रीय हँगओव्हर दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या कोणी नवीन वर्षाच्या संध्याकाळी जोरदार पार्टी केली असेल, त्या प्रत्येकाची डोकेदुखी साजरी करण्याचा हा दिवस आहे! तर या हँगओव्हर डे 2020 चे औचित्य साधून आम्ही आपल्यासाठी काही हँगओव्हर मीम्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमचा हँगओव्हर उतरताना तुमचे मनोरंजनही होईल.

 

View this post on Instagram

 

#chrismasparty #newyearsparty #hangovermemes #meme_by_jujube #jokes😂 who can survive new years ??

A post shared by jujube (@memes_by_jujube) on

 

View this post on Instagram

 

Hungover AF #hungover #hangover #christmasparty #xmasparty #hangovermemes #neveragain #untilnexttime

A post shared by Sarah (@sarahandevad) on

(हेही वाचा: Happy New Year 2020: LSD बाबत विचारणाऱ्या ट्विटर युजर्सला पुणे पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर; कमेंट्स वाचून तुम्ही ही व्हाल फॅन)

नवीन वर्षासाठी पार्टी करणे हे आजकाल अगदी कॉमन झाले आहे आणि लोक त्यासाठी आधीपासूनच योजना आखतात. परंतु एकदा का नवीन वर्षाच्या जानेवारीचा पहिला दिवस पहिला आणि हँगओव्हर जाणवला, की काल रात्री इतक्या मोठ्या प्रमाणावर पार्टी केली याचेच वाईट वाटते. या गोष्टी थोड्या हलक्या होण्यासाठी सध्या हे हँगओव्हरवर काही विनोद आणि मीम्स ट्रेंड होत आहेत.