Happy New Year 2020: LSD बाबत विचारणाऱ्या ट्विटर युजर्सला पुणे पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर; कमेंट्स वाचून तुम्ही ही व्हाल फॅन
Pune Police Tweet | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

Happy New Year 2020: नववर्ष 2020 (New Year 2020 चे स्वागत करताना कोणत्याही प्रकारच्या नशिल्या आणि अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे अवाहन करणाऱ्या पुणे पोलिसांनी (Pune Police) एका ट्विटर युजर्सला खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. नववर्षाचे स्वागत करताना आणि या स्वागताचा आनंद साजरा करताना अनेक नागरिक विविध पार्ट्यांचे आयोजन करतात. अशा पार्ट्यांमधून अनेक लोक नशा आणि अंमली पदार्थांचे सेवन करतात. या पार्श्वभूमीवर Charas, Ganja, Meow Meow असे म्हणत, पुणे शहर पोलिसांनी (Pune City Police) नागरिकांना नशा आणि अंमली पदार्थांचे सेवन करण्यापासून दूर रहावे असे अवाहन केले ट्विटरच्या माध्यमातून केले होते. त्यासाठी #NewYearResolution 2020 मध्ये हे सर्व नको भाऊ !! #SayNoToDrugs असा हॅशटॅगही वापरला होता. पुणे पोलिसांच्या या हॅशटॅगवर फिरकी घेत LSD ला परवानगी आहे भाऊ, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही प्रतिक्रिया त्याने आपल्या अकाऊंटवरुन पुणे पोलिसांना टॅग केली. त्यानंतर पुणे पोलीस आणि ट्विटर युजर्स यांच्यात मजेदार संवाद सुरु झाला.

एलएसडीला परवानगी आहे असे म्हणणाऱ्या एका युजर्सला प्रतिक्रिया देताना पुणे पोलिसांनी म्हटले की, एलएसडी बाळगणाऱ्या व्यक्तीची आम्हाला कल्पना द्या. त्यावर दुसरा एक युजर्स म्हणाला की, तुम्ही धाड टाकली की त्यातील 10 पुड्या माझ्या. यावर पुणे पोलिसांनी मजेदार उत्तर देत सांगितले की, सर्व पुड्या तुझ्या आणि तुझा मुक्काम आमच्याकडे. (हेही वाचा, Happy New Year 2020 Wishes: नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश, ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून खास करा नव्या वर्षाचा पहिला दिवस!)

पुणे पोलीस ट्विट

युजर्सला पुणे पोलिसांचे उत्तर

युजर्सला पुणे पोलिसांचे उत्तर

युजर्सला पुणे पोलिसांचे उत्तर

आणखी एका युजर्सने 'दारूवर तर अशी काही बंदी नाही न भाऊ' अशी प्रतिक्रीया दिली. त्यावर दारु पिऊन गाडी चालवण्यावर बंदी आहे असे सांगितले. एक युजर्स म्हणाला की, आणि २४ × ७ लागू आहे बरोबर? कारण पुणेकर १ ते ४ झोपत असतील पण पुणे पोलिस दिवस-रात्र सदैव सेवेत तत्पर असते!! यावर पुणे पोलीसांनी पुन्हा एकदा त्याला #NewYearResolution 2020 मध्ये हे सर्व नको भाऊ !! #SayNoToDrugs असे म्हणत समजावले.

युजर्सला पुणे पोलिसांचे उत्तर

पुणे पोलीस सोशल मीडियावर नेहमीच विशेष कार्यरत असतात. शहर, जनता, नागरिक आदिंच्या सुरक्षेसाठी सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, सेवा, सुविधा यांबाबत नेहमीच नवनव्या अपडेट पुणे पोलीस ट्विटरच्या माध्यमातून देत असतात. मग यात वाहतुक मार्गातील बदल असोत, किंवा अचानक दिलेला अलर्ट असो. पुणे पोलीस नेहमीच जनतेपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, कधी कधी काही ट्विटर युजर्स पुणे पोलिसांची फिरकी घेतात आणि मग पुणे पोलीस त्यांना आपल्या खास शब्दांत प्रतिक्रिया देत असतात.