Happy New Year 2020 Wishes: नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश,  Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून स्वागत करा 21 व्या शतकातील तिसर्‍या दशकाचं
Happy New Year 2020 Wishes HD Images (Photo Credits: File Image)

Happy New Year 2020 Marathi Wishes:  2019 ला अलविदा म्हणून आता 2020 या   नववर्षाची (New Year) सुरूवात झाली आहे. यंदा हे नवं म्हणजे 21 शतकातील तिसर्‍या दशकाची सुरूवात आहे. मग  नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये (New Year Celebrations) तुम्ही यंदा  तुमच्या प्रियजनांजवळ नसाल तर यंदा किमान फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, इंंस्टाग्राम स्टेट्स, मेसेंजरद्वारा त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा (Happy New Year Wishes) देण्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. आजकाल इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ येतयं. मग तुमच्या परिवारातील लोकांसोबत, मित्र-मैत्रिणींना 2020 सालामध्ये नव्या वाटचालींसाठी, आगामी वर्षात नव्या आशा-अपेक्षा, स्वप्नांचा ध्यास घेण्यासाठी शुभेच्छा देऊन नव्या वर्षाचा पहिला दिवस विस्मरणीय करा. त्यासाठी आत्ताच Happy New Year म्हणत नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे मेसेजेस, ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, SMS,HD Images, GIFs ते व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स नक्की शेअर करा. Happy New Year 2020 Messages: नववर्षाच्या शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शेअर करून प्रियजनांना द्या आगामी नव्या वर्षाच्या शुभेच्छा!

यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 2020 या नववर्षाची सुरूवात होणार आहे. या कॅलेंडरनुसार 1 जानेवारी या नववर्षाच्या पहिल्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. भारताप्र्माणे जगभरात लोकं त्यांच्या प्रार्थनास्थळांना भेट देऊन पुढील वर्षभरासाठी सुख, समृद्धी, आनंदासोबतच सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करतात. मग यंदा तुमच्या आवडत्या व्यक्तींच्या आयुष्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी ही काही शुभेच्छापत्र, मेसेजेस तुम्हांला नक्कीच मदत करतील.

Happy New Year 2020 Marathi Wishes

Happy New Year 2020 Marathi Wishes| File Photo

नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो प्रकाशमान,

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या शुभेच्छा छान!

नूतनवर्षाभिनंदन!

Happy New Year 2020 Marathi Wishes| File Photo

पुन्हा एक नवं वर्ष

पुन्हा एक नवी आशा

तुमच्या आयुष्याला मिळो

पुन्हा एक नवी दिशा

नवी स्वप्न, नवी क्षितिजं

सोबत  माझ्या नववर्षाच्या  हार्दिक शुभेच्छा !

Happy New Year 2020 Marathi Wishes| File Photo

Happy New Year

आपणा सर्वांना 2020 या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy New Year 2020 Marathi Wishes| File Photo

येवो सुख, समृद्धी अंगणी,

वाढो आनंद तुमच्या जीवनी,

तुम्हासह तुमच्या कुटुंबासाठी या शुभेच्छा,

2020 नववर्षाच्या शुभदिनी !

Happy New Year 2020 Marathi Wishes| File Photo

2020 हे नवं वर्ष तुमच्या आयुष्यात

सुख, समाधान, भरभराट घेऊन येवो

याच आमच्या शुभेच्छा

नूतनवर्षाभिनंदन!

Happy New Year 2020  GIFs

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

हिंदू नववर्ष आणि इतर सणांप्रमाणेच इंग्रजी कॅलेंडरनुसार नववर्षाची सुरूवात देखील मोठ्या उत्साहात करण्याची प्रथा आहे. मग यंदा मागील वर्षभरात झालेल्या चूका, कटू आठवणी, वाईट प्रसंग सारे मागे सारून पुन्हा नव्याने आयुष्यात नवी सुरूवात करण्याची संधी येणारं नववर्ष तुमच्यासाठी घेऊन आलं आहे. मग ही संधी दवडू नका! तुमचा यंडाचा नववर्षाचा संकल्प काय आहे? हे देखील आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका.