Pune Drugs Case: अंमली पदार्थांचा विळखा; Private Detective द्वारे मुलांवर नजर, पुणे येथील पालकांचा प्रताप
Private Detective | (Photo credit: X)

पोर्श कार अपघात (Pune Porshe Car Accident), ड्रग्ज प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग, पब्ज आणि बार, कोयता गँग अशा एक ना अनेक कारणांमुळे पुणे शहर आणि जिल्हा चर्चेत आहे. त्यातच अपघात आणि अंमली पदार्थांचे सेवन (Pune Drugs Case) करण्यात अल्पवयीन मुले आणि महाविद्यालयीन तरुणही आघाडीवर असल्याचे पुढे आल्यापासून, पालकांचे धाबे दणाणले आहेत. धक्कादायक म्हणजे या मुलांवर आता खासगी गुप्तहेरांकडून (Private Detective) नजर ठेवली जात आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात मुलांच्या पालकांकरवी हा प्रताप केला जात आहे.

नागरिक आणि विरोधकांच्या पवित्र्यानंतर सरकारला जाग

अनेक खासगी डिटेक्टीव्ह कंपन्यांनी मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी विचारणा केल्याचे म्हटले आहे. एबीपी माझा या खासगी वृत्तवाहिणीने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक पुणे येथील पालकांनी खासगी डिटेक्टिव्हची मदत मागितली आहे. अलिकडेच पुढे आलेल्या अनेक ड्रग्ज प्रकरणांमध्ये काही पोलीस आणि अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पुढे आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पुणे शहरातील नागरिक, स्थानिक आमदार आणि विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडल्यानंतर राज्य सरकार आणि प्रशासनालाही जाग आली. शहरातील अवैध आणि अनधिकृत हॉटेल्स, पब अथवा तत्सम बाबी तातडीने हटविण्याबाबत सरकारने प्रशासनाला आदेश दिले आणि कारवाई सुरु झाली. असे असले तरी, पालकांवर खासगी डिटेक्टीव्हच्या माध्यमातून नजर ठेवावी लागणे हे चिंताजनक मानले जात आहे. (हेही वाचा, Ravindra Dhangekar on Pune Drugs case: पुणे ड्रग्ज प्रकरण, रविंद्र धंगेकर यांच्या दाव्यामुळे खळबळ)

मुलांवर ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने पाळत

धक्कादायक म्हणजे अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेली अनेक मुले ही शाळा आणि महाविद्यालयांतील तरुण आहेत. आपला मुलगा घरी ठिक असतो पण बाहेर गेल्यावर तो कोणाच्या संपर्कात असतो, त्याचा मित्र परिवार कोण आहे. तो कोणाच्या संपर्कात आहे, तो अंमली पदार्थांचे सेवन तर करत नाही ना? यांसारख्या अनेक चिंता पालकांना सतावू लागल्या आहेत. परिणामी पालकांना मुलांवर नजर ठेवणे शक्य नसल्याने अनेक पालकांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे. या गुप्तहेरांनी मुलांवर ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने लक्ष ठेवावे अशी पालकांची इच्छा आहे. त्यासाठी अनेक पालक आर्थिक मोबदला देण्यासाठ खिसा काहीसा सैल ठवण्यासही तयार असल्याचे समजते. (हेही वाचा: Pune Accident: पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण ताज असतानाच, अज्ञात कारची आणखी एकाला धडक)

दरम्यान, आजवर कुटुंबव्यवस्था मजबत असणे हेच आपल्या भक्कम समाजव्यवस्थेचे यश मानणाऱ्या समाजात आपल्याच मुलांवर खासगी गुप्तहेराद्वारे पाळत ठेवावी लागणे हे दुर्दैवी समजले जात आहे. धक्कादायक म्हणजे अनेक पालकांना आपल्या मुलांच्या वर्तनात झालेले बदलही टीपता येत नाहीत. परिणामी त्याच्या सवयी बदलल्यात की तो व्यसनांच्या आहारी गेल्याने त्याच्यात बदल झाला आहे हे ओळखण्यातच अनेक पालकांमध्ये संभ्रम असल्याचे पाहायला मिळत आहे.