थर्टी फर्स्ट (31 December) म्हटले आणि मद्यपान नाही असंच होणारच नाही. कारण मद्यप्रेमींसाठी थर्टी फर्स्ट आणि मद्यपान हे जणू समीकरणच बनलं आहे. त्याशिवाय नववर्षाचे जंगी स्वागत होऊ शकत नाही असा त्यांचा स्वयंघोषित समज आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या रात्री अगदी बेभान होऊन मांसाहारी जेवणावर आणि मद्यपानावर ते ताव मारतात. अशा मद्यप्रेमींपैकी काहींना 1 जानेवारीला कामावर वा अन्य कामासाठी बाहेर जावे लागणार असेल तर त्यांचा थर्टी फर्स्टचा हँगओव्हर उतरणे फार गरजेचे आहे. तसे न झाल्यास मळमळणे, डोकं जड होणे, उलट्या होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकता. म्हणूनच घरी काही हँगओव्हरचे (Hangover) उपाय तुम्ही ट्राय करु शकता.
या घरगुती आणि झटपट उपायांनी तुमचे हँगओव्हर देखील उतरण्यास मदत होईल. घरात उपलब्ध असलेल्या वा सहज उपलब्ध होणा-या गोष्टींनी तुम्ही तुमचे हँगओव्हर उतरवू शकता.हेदेखील वाचा- Mocktails For New Year Celebration: नववर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा 'हे' मॉकटेल्स, Watch Videos
1. हँगओव्हर उतरवण्यासाठी सर्वात लोकप्रिय उपाय म्हणजे साध्या पाण्यात लिंबाचा रस टाकून ते पाणी पिणे
2. नारळाचे पाणी पिऊन तुम्ही हॅंगओव्हर उतरवू शकता.
3. हे. एक कप कडक कॉफीमुळे हॅंगओव्हर गायब होते. एकाच वेळी कॉफी पिण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने अर्धा अर्धा कप कॉफी प्या.
4. आल्याचा चहा देखील हँगओव्हर उतरविण्यास मदत करतो.
5. खजूर देखील दारूची झिंग उतरविण्यास मदत करतो. त्यामुळे खजूर खा.
6. हँगओव्हर झाले असेल तरी ब्रेकफास्ट मिस करणे योग्य नाही. वेळेवर नाश्ता करा. याने ब्लड शुगर लेवल वाढते आणि हँगओव्हरपासून राहत मिळते. ब्रेकफास्टमध्ये ब्रेड किंवा ऑम्लेट खाऊ शकता. ऍपल ज्यूस पिणे योग्य ठरेल.
या झटपट टिप्स तुम्हाला हँगओव्हर उतरविण्यासाठी नक्की कामी येतील. याचा अर्थ तुम्ही मनसोक्त मद्यपान करा असेही नाही बरे. तर ते नियंत्रणात ठेवून केलेलेच अति उत्तम.