Fact Check: केंद्र सरकार 10 कोटी लोकांना 3 महिन्यांसाठी देणार मोफत इंटरनेट सेवा? पीआयबीने केला खुलासा
Fake Message (Photo Credit: PIB)

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती (Fake News) पसवली जात आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच भारत सरकार 10 कोटी वापरकर्त्यांना 3 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट (Free Internet Service) सेवा देणार असल्याची माहिती प्रचंड व्हायरल होत आहे. पीआयबीने (PIB) या मॅसेजमागचे सत्य शोधून काढले आहे. तसेच हा मॅसेज फेक असल्याचेही पीआयबीने सांगितले आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मॅसेजमध्ये लिहले आहे की, 10 कोटी वापरकर्त्यांना अभ्यास करण्यासाठी 3 महिने मोफत इंटरनेट सेवा दिली जात आहे. आपल्याकडे जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचे सिम कार्ड असल्यास आपण या सेवेचा लाभ घेऊ शकता. मी देखील या सेवेचा लाभ घेतला आहे, असेही सांगितले जात आहे. हे देखील वाचा- Fact Check: टाटा हेल्थच्या नावावर 'COVID-19 Three Stages' उपचाराचा व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज पुन्हा समोर; या मॅसेजमागचे सत्य घ्या जाणून

ट्वीट-

व्हॉट्सअपवर पाठवण्यात येत असलेला या मॅसेजचा पीआयबीने तपास केला आहे. पीआयबीने केलेल्या तपासात ही संपूर्ण माहिती फेक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भारत सरकारकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. यामुळे नागरिकांनी अशाप्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.