Jio Airtel Vi Tariff Hike: रिलायन्स जिओ, एअरटेलने 3 जुलैपासून आपले सर्व प्लान्स महाग केले (Jio Airtel Recharge New Rate)आहेत. तर व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लान्स 4 तारखेपासून म्हणजेच उद्यापासून महाग होणार आहेत. म्हणजेच आता कोट्यवधी युजर्सना रिचार्ज करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. जाणून घेऊया आता तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागणार आहेत. (हेही वाचा:Tech Layoffs 2024: जानेवारी 2024 पासून 1 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या; एकट्या जूनमध्ये आकडा 41 हजारांवर-रिपोर्ट )
रिलायन्स जिओचे प्लान्स
जिओच्या 155 रुपयांच्या प्लानची किंमत आता 189 रुपये झाला आहे. तर जिओच्या 239 रुपयांच्या प्लॅनची किंमत 299 रुपये झाली आहे. वार्षिक प्लानमध्ये सर्वात मोठी वाढ झाली असून आता 2,999 रुपयांऐवजी आता त्यासाठी 3,599 रुपये मोजावे लागतील.
एअरटेलचे प्लान्स
जिओपाठोपाठ एअरटेलनंही प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. एअरटेलच्या 179 रुपयांच्या प्लानसाठी आता 199 रुपये मोजावे लागतील. तर 1799 रुपयांच्या वार्षिक प्लानची किंमत आता 1999 रुपये मोजावे लागणार आहेत.
व्हीआयचे प्लान्स
उद्या 4 जुलैपासून व्होडाफोन-आयडियाचेबी प्लान्सही महागणार आहेत. व्हीआयचा 179 रुपयांचा बेसिक प्लॅन 4 जुलैपासून 199 रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे कंपनीनं आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत जवळपास 20 टक्क्यांनी वाढ केलीये. तर व्होडाफोनचा 1799 रुपयांचा प्लॅन 1999 रुपयांना मिळेल.