रिलायन्स जिओ पाठोपाठ एअरटेल आणि VI नेही त्यांचे टॅरिफ प्लॅन महाग केले. या वाढीनंतर तुम्हाला एअरटेलचा वर्षभराचा प्लॅन कमी किमतीत हवा असेल तर अशाच प्लॅनची आज तुम्हाला माहिती देत आहोत ज्याची व्हॅलिडिटी 365 दिवस आहे. या प्लॅनची किंमत 1,999 रुपये आहे. ही कंपनीची सर्वोत्तम दीर्घकालीन योजना आहे. हे युजर्सला सर्वात कमी किमतीत 365 दिवसांची व्हॅलिडिटी देते. 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह, युजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळते. (हेही वाचा - BSNL New 395 Day Plan: बीएसएनएलचा नवा प्लॅन, प्रतिदिन मिळणार 2GB हाय-स्पीड डेटा आणि विनामूल्य गेमिंग; वैधता कालावधी, आणि कॉलिंग दर किती? घ्या जाणून)
या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. तसेच 24 GB डेटा मिळतो. तथापि, युजर अतिरिक्त डेटा देखील खरेदी करू शकतो. यासाठी यूजरला डेटा व्हाउचर वापरावे लागेल. ज्या यूजर्सना कमी डेटा आणि अधिक व्हॅलिडिटी असलेला प्लॅन हवा आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय आहे. युजरला अपोलो 24|7 सर्कलमध्ये तीन महिने मोफत एक्सेस मिळतो. यासोबतच यूजरला विंक आणि विंक म्युझिकवर मोफत हॅलो ट्यूनची सुविधाही मिळते. याशिवाय, 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह एअरटेलच्या अन्य प्लॅनची किंमत 3,599 रुपये आणि 3,999 रुपये आहे.
Airtel आपल्या ग्राहकांना सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन अर्थात 199 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची सुविधा देखील देते. या किमतीत कंपनी ग्राहकांना मोफत कॉलिंग आणि डेटा सुविधा पुरवते.