कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या वर्षाभरापासून सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात चुकीच्या माहितीचा (Fake News) प्रसार केला जात आहे. दरम्यान, व्हॉट्सअप, फेसबूक, इंस्टाग्राम यांसारख्या अॅपच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते. देशात पुन्हा एकदा कोरोनाचे संकटाने डोके वर काढले आहे. याचाच गैरफायदा घेऊन समाज कंटक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच कोरोना उपचारासंबंधित आणि टाटा हेल्थशी चुकीच्या पद्धतीने जोडलेला एक मॅसेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.
टाटा समूहाने दिलेला सल्लागार म्हणून हा बनावट मॅसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल मॅसेजच्या माध्यमातून कोरोना उपचारांबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीला नाकाद्वारे कोरोनाचे संक्रमण झाले असेल तर, त्यांना वाफ घेऊन किंवा व्हिटॅमिन सी खाऊन अर्ध्या दिवसात कोरोनावर मात करता येऊ शकते. हे देखील वाचा- Monalisa Hot Photos: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा पुन्हा एकदा पाहायला मिळाला बोल्ड अवतार, फोटो पाहून चाहते झाले फिदा
तसेच घशातून कोरोनाचे संक्रमण झालेल्या बाधित कोमट पाणी पिऊन बरे होऊ शकतात. जर फुफ्फुसात कोरोना संक्रमण झाले असेल आणि रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्याने पॅरासिटामोल घ्यावा आणि श्वास घेण्याचा सराव करावा. याशिवाय भरपूर पाणी प्यावे, असेही या मॅसेजमध्ये सांगण्यात आले आहे.
एवढेच नव्हेतर, कोरोनाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोविड19 मेडिकल कीट तयार ठेवा. ज्यात पॅरासिटामॉल, व्हिटॅमिन सी आणि डी 3, बी कॉम्प्लेक्स, बीटाडिन, ऑक्सिमीटर, वेपर प्लस कॅप्सूल, आरोग्य सेतु अॅपचा सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच श्वास घेण्याचाही सराव केला पाहिजे, असेही सांगण्यात आले आहे.
ट्वीट-
We are sorry but the above message received by you is not from Tata Health. Kindly inform the same to the group from where you received this message.
— Tata Health (@tatahealth) June 13, 2020
टाटा हेल्थने हा मॅसेज बनावट असल्याचे म्हटले आहे. ट्विटर वापरकर्त्याला उत्तर देताना टाटा हेल्थ म्हणाले की, 'आम्हाला माफ करा पण तुम्हाला मिळालेला संदेश टाटा हेल्थने जारी केलेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ज्यांनी आपणांस ही माहिती दिली आहे, त्यांनाही याबाबत कळवण्यात यावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.