Monalisa (Image Credit: Instagram)

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) हिचे सोशल मिडियावर असंख्य फॉलोअर्स आहेत. तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे ती नेहमीच चाहत्यांच्या गराड्यात असते. तिचे हॉट फोटोज सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असतात. नुकतेच तिने सोशल मिडियावर तिचे हॉट फोटोज (Hot Photos) शेअर केले आहेत. हे फोटोज पाहून चाहत्यांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही. यात तिचा ग्लॅमरस लुक तिच्या सौंदर्याला चार चांद लावत आहे. मोनालिसाचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना देखील फार आवडलाय. या फोटोज आतापर्यंत अनेक व्ह्यूज मिळाले आहेत.

मोनालिसाने या फोटोजमध्ये काळ्या रंगाचा ब्लाउज आणि सोनेरी रंगाचा स्कर्ट घातला आहे. तिचा हा लुक खूपच कमाल आहे. खरे पाहता मोनालिसाचा हा फोटो थोडा जुना आहे. मात्र या फोटोज चाहत्यांची हृदयाचे ठोके मात्र वाढले आहेत.हेदेखील वाचा- भोजपुरी अभिनेत्री Monalisa हिने आपल्या हनिमून खूपच रोमँटिक फोटो केला शेअर, तिचा हॉटनेस पाहून चाहते झाले घायाळ

 

View this post on Instagram

 

A post shared by MONNALLISA (@aslimonalisa)

मोनालिसाच्या फोटोज इतकेच तिच्या डान्सचे व्हिडिओज देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. दरम्यान मोनालिसाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तिचे पती अभिनेता विक्रांत सिंह याने याबाबत माहिती दिली आहे. सध्या ती मुंबईत आहे. आणि मोनालिसा होम क्वारंटाईन आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु आहेत.

चित्रपटांत आल्यानंतर तिने आपले नाव बदलून मोनालिसा ठेवले आणि या नावाने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोजमुळे तिचे इन्स्टाग्रामवर 4.2 मिलियन्स इतके फॉलोअर्स आहेत.