भोजपुरी अभिनेत्री Monalisa हिने आपल्या हनिमून खूपच रोमँटिक फोटो केला शेअर, तिचा हॉटनेस पाहून चाहते झाले घायाळ
Monalisa (Photo Credits: Instagram)

सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) सध्या प्रचंड धुमाकूळ घालत आहे. ऑनस्क्रीन तिला पाहून तिचे चाहते जितके दीवाने आहेत तितकेच सोशल मिडियावरही... आपले एकाहून एक हॉट फोटोज आणि व्हिडिओज शेअर करून तिने चाहत्यांना घायाळ केले आहे. तिचे फोटोज सोशल मिडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतात. मात्र नुकताच तिने आपल्या हनिमूनचा एक खूपच रोमँटिक फोटो (Honeymoon Photo) शेअर केला आहे. या फोटोमधील तिचे हॉटनेस पाहून चाहत्यांवर अक्षरश: वेड लागण्याची वेळ येईल.

काही दिवसांपूर्वी मोनालिसाने सोशल मिडियावर 'आस्क मी' (Ask Me) हा सेशन केला होता. त्या माध्यमातून तिने आपल्या चाहत्यांना हवे ते प्रश्न विचारण्याचे स्वतंत्र दिले होते. त्यावेळी एका चाहत्याने मोनालिसाला तिच्या हनिमूनचा फोटो शेअर करण्यास सांगितला. त्यावर मोनालिसाने पती विक्रांत सिंह सिंग सोबत स्विमिंग पुलमध्ये पोहत असल्याचा कँडिड फोटो शेअर केला.हेदेखील वाचा- Sara Ali Khan चा 'हा' ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांच्या खिळतील नजरा, See Pics

Monalisa Honeymoon Pic (Photo Credits: Instagram)

मोनालिसाचा हा फोटो गोव्याचा आहे. जिथे मोनालिसा विक्रांतसह आपला पहिला हनिमून छान एन्जॉय करताना दिसत आहे. हा फोटो पाहून तिचे चाहतेही अवाक् झाले आहेत. मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे.

चित्रपटांत आल्यानंतर तिने आपले नाव बदलून मोनालिसा ठेवले आणि या नावाने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोजमुळे तिचे इन्स्टाग्रामवर 4.2 मिलियन्स इतके फॉलोअर्स आहेत.