भाजी विक्रेता | प्रतिनिधित्त्व हेतूने वापरलेला फोटो (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आजाराशी संबंधित माहितीमधील एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्राणघातक विषाणू पसरविण्यासाठी भाजी विक्रेते भाजीपाला आणि फळांवर थुंकत असल्याचे म्हटले जात आहे. फेक न्यूज मॉन्गर्सनी व्हायरल ऑडिओ क्लिपला जातीय दृष्टिकोन दिला आणि अल्पसंख्याक समुदायाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रकार माहिती ब्युरोने (PIB) गुरुवारी ऑडिओ क्लिप बनावट असल्याचे घोषित केले. भारत सरकारच्या (Indian Government) अंतर्गत पीआयबीने या व्हायरल ऑडिओ क्लिपचे सत्य उघड केले आहे. गेल्या काही दिवसांपासून समाजातील एका विशिष्ट घटकाला टार्गेट करत अनेक प्रकारच्या बनावट आणि निराधार गोष्टी पसरल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात प्रशासन आणि पोलिसांनी कित्येक लोकांना कडक चेतावणी देत पकडले असून गुन्हा दाखल करून त्यांना तुरूंगात पाठविले आहे. (Fact Check: ऑक्टोबर 2020 पर्यंत हॉटेल, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स बंद रहाणार? COVID-19 लॉकडाउन काळात व्हायरल होत असलेल्या या मेसेज मागील सत्य जाणून घ्या)

पीआयबीने ट्विटमध्ये लिहिले की,"सोशल मीडियावरील व्हायरल ऑडिओ क्लिपने असा दावा केला आहे की भाजी विक्रेते भाजीपाला/फळे चाटून किंवा त्यावर थुंकून कोविड-19 पसरवित आहेत. ऑडिओ क्लिपमध्ये केलेला दावा चुकीचा आहे आणि तो समाजात तडा आणण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे."

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील बनावट व्हिडिओमध्ये असा दावा केला गेला होता की काही मुस्लिम समाजातील लोकं चमचा, प्लेट्स आणि भांड्यांवर आपली लाळ लावत आहेत आणि कोरोना विषाणूचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यांना पोलिसांनी अटक केली. सोशल मीडियावर सध्या कोरोना विषाणूशी संबंधित प्रत्येक बनावट बातम्या जंगलातील आगीसारखी पसरत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही कोणत्याही ऑनलाइन बातमीची सत्यता तपासण्याबाबत किंवा त्याच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची तपासणी करण्याचे आवाहन करतो. आणि कोणतीही बातमी किंवा पोस्ट शेअर करण्यापासून टाळावे.