Fact Check: आयुष्यमान भारताच्या वेबसाइटवर 'आयुष्मान मित्र भर्ती 2020' ची घोषणा? PIB ने केला व्हायरल YouTube व्हिडिओचा खुलासा
आयुष्मान मित्र भर्ती 2020' (Photo Credits: PIB Fact Check)

Fact Check: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हायरल युट्युब व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की, आयुष्मान भारतच्या वेबसाइटवर (Ayushman Bharat)  आयुष्मान मित्र भर्ती 2020 (Ayushman Mitra Recruitment 2020)  ची घोषणा केली आहे. व्हिडिओ ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसह अन्य काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान शेअर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना ही भारत सरकारची एक योजना आहे. ज्यामध्ये 40 टक्के लोकांना आरोग्य संबंधित सेवा मोफत दिल्या जातात. योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांना आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून प्राथमिक स्वरुपातील सेवांचा फायदा घेऊ शकतात.(Fact Check: किसान विकास मित्र समिती कृषी मंत्रालयाच्या वेबसाईटद्वारे देत आहे नोकरीची संधी? PIB ने सांगितले सत्य)

युट्युब व्हिडिओत असा दावा केला आहे की, आयुष्मान भारताच्या वेबसाइटवर आयुष्मान मित्र भर्ती 2020 ची घोषणा केली आहे. आयुष्मान मित्र भर्ती 2020 ची खोटी बातमी व्हायरल झाल्यानंतर PIB यांनी याबद्दल खुलासा केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, आयुष्मान भारत योजना अंतर्गत अशा कोणत्याही पद्धतीच्या भर्तीची घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच व्हिडिओतील दावा स्पष्टपणे खोटा असून वेबसाईटवर ही याबद्दल काही सांगण्यात आलेले नाही.(PIB Fact check: सरकार सार्‍या विद्यार्थ्यांना मोफत Tablets देणार? जाणून घ्या या व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या दाव्यात खरंच तथ्य आहे का?)

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या काळात सातत्याने सोशल मीडियात अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या, माहिती वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांनी अशा गोष्टींपासून सावध रहावे असे आवाहन सरकार कडून करण्यात आले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर खोट्या आणि दिशाभुम करणाऱ्या सुचनांवर लगाम लावण्यासाठी सरकारकडून फॅक्ट चेकचा वापर केला जात आहे.