कोरोना वायरस लॉकडाऊन काळात अजुनही भारतामध्ये अनेक राज्यात शाला, कॉळेज सह इतर शैक्षणिक संस्था बंद आहेत. जून महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू झालं असलं तरीही अद्याप शाळा उघडलेल्या नाहीत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक वर्ष निम्मं घरातूनच गेलं आहे. यामध्ये ऑनलाईन वर्ग आणि इतर अभ्यास सुरू आहे. शहराप्र्माणे ग्रामीण भागात देखील सारखीच परिस्थिती आहे. आर्थिक स्थिती चांगली नसलेल्यांसाठी अजून एक आव्हान म्हणजे स्मार्टफोन, टॅब किंवा लॅपटॉपची उपलब्धता याच गोष्टीचा फायदा घेत काहींनी सध्या खोटे व्हॉट्सअॅप मेसेज शेअर करून फसवणुक करण्याचा प्रयत्न केला आहे. आजकाल व्होट्सअॅपवर सरकार सार्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब देणार असल्याचा एक मेसेज व्हायरल होत आहे. पण हा मेसेज खोटा आहे. PIB ने ट्वीट करत हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.
व्हॉटअॅप फॉर्वर्ड नुसार, भारताचा साक्षरता दर सुधारण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. सरकार टॅब देण्यासाठी मदत करत आहे तर हा मेसेज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा असे देखील भावनिक आवाहन केले आहे. सोबतच एक लिंक आहे. त्यामध्ये एनरॉल करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत. पण हा दावा खोटा आहे. केंद्र सरकार किंवा अन्य कोणत्याही राज्यात अशाप्रकारे मोफत टॅब देण्याचा सध्या कोविड 19 संकटात प्लॅन नाही. खोट्या वेबसाईट्सच्या जाळ्यात सामान्य नागरिकांनी अडकू नये, खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे देखील सांगण्यात आले आहे. Fact Check: किसान विकास मित्र समिती कृषी मंत्रालयाच्या वेबसाईटद्वारे देत आहे नोकरीची संधी? PIB ने सांगितले सत्य.
PIB Facr Check Tweet
A viral WhatsApp forward claims that the Government is providing free Tablets to all the students.#PIBFactcheck: This claim is fake. Govt. has not made any such announcement. It is an act of miscreants and citizens should refrain from engaging with such fraudulent websites. pic.twitter.com/BqqBXEszqy
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 29, 2020
मागील काही महिन्यात अशाप्रकारे अनेक खोट्या पसरवण्यात आल्या आहेत. सरकारच्या नावाने नागरिकांची फसवणूक केली जात आहे. वेळोवेळी सरकार त्यांच्या योजनांबद्दल माहिती देत आहे. मात्र त्याव्यतिरिक्त तुमच्याकडे कोणता मेसेज येत असल्यास त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणं टाळा.