'मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही'; शरद पवार- अमित शाह भेटीवर शिवसेना नेते संजय राऊतांनी ट्विटद्वारे दिले स्पष्टीकरण
Sharad Pawar, Amit Shah and Sanjay raut (Photo Credits: PTI)

देशभरात सर्वत्र धुळवडीचा उत्साह साजरा होत असताना राजकीय वातावरणात आज वेगळ्याच चर्चेची धुळवड सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या झालेल्या भेटीवरुन अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही गुप्त भेट कशासाठी होती, का होती यांसारखे अनेक प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाले. तसेच ही राजकारणात काही गौप्यस्फोट होण्याची चिन्हे नाही ना अशीही शंका व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्वांवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ट्विटच्या माध्यमातून संजय राऊतांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

"मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही . आता तरी रहस्य कथेचा शेवट करा.अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही." असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.हेदेखील वाचा- Sanjay Raut on Sharad Pawar, Amit Shah Meeting: शरद पवार - अमित शहा भेटले असतील तर त्यात गैर काय? संजय राऊत यांचा सवाल

तसेच "देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेतो भेटतो यात चुकीचं काय आहे. आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो. कामानिमित्त भेट झाली असेल तर चुकीचं काहीच नाही," असं संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

"देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेतो भेटतो यात चुकीचं काय आहे. आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो. कामानिमित्त भेट झाली असेल तर चुकीचं काहीच नाही, असं संजय राऊत म्हणाले. राजकारणात कोणतीही बैठक गुप्त नसते. अनेक गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. मात्र नंतर त्या सार्वजिनिक होतात, जसं की बंद खोलीतील चर्चा असो," असा टोला संजय राऊत यांनी त्यांनी अमित शाह यांना लगावला.