Holi |

जावई (Son in Law) म्हटला की त्याचा मानपान नीट व्हायला पाहिजे यासाठी त्याच्या सास-याच्या मंडळीची तारेवरची कसरत सुरु असते. जावई आपल्यावर रुसायला नको नाही यासाठी जावई आपल्या घरी आल्यावर त्याची नीट काळजी घेतली जाते असे चित्र आपण अनेकदा पाहतो. मात्र बीड जिल्ह्यातील एका गावात रंगपंचमीच्या दिवशी गाढवावरून जावयाची वरात काढण्याची अजब परंपरा पूर्वापार चालत आली आहे. या परंपरेनुसार 'निवडलेल्या जावयाला' गाढवावर बसून सैर केली जाते. यानंतर जावयाला सोन्याची अंगठी आणि कपडे देऊन त्याचं औक्षण केलं जातं.

जावयाची गाढवावरून वरात काढण्याची ही अजब परंपरा होते ती बीड जिल्ह्यातील केज तहसीलच्या विडा येवता गावात... जवळपास 80 वर्षापासून ही परंपरा या गावात सुरु आहे. गावक-यांनी दिलेल्या माहितीनुसार, जावयाला गाढवावर बसून त्याला गावभर फिरवले जाते. त्यानंतर त्याला भेटवस्तू देऊन त्याचे कोडकौतुक केले जाते. ही मिरवणूक सकाळी 11 वाजता गावातील मंदिरात संपते. मात्र यंदा कोरोनामुळे या परंपरेवर बंदी आणण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Dhulivandan 2021: देशभरात होळीचा उत्साह, मध्य प्रदेश, मथुरा, आसाम मध्ये पारंपारिक पद्धतीने साजरा केला धूलिवंदनाचा सण, Watch Photos and Videos

कशी सुरू झाली ही परंपरा?

गावात राहणाऱ्या सुमित सिंह देशमुख यांनी Zee 24 Taas शी बोलताना सांगितलं की, त्यांचे पंजोबा अनंतराव देशमुख यांच्या आठ दशकांअगोदर ही परंपरा सुरू झाली. सुमित सिंह यांच्या म्हणण्यानुसार, खापर पंजोबांचे जावई रंगपंचमी खेळण्यास नकार देत होते. तेव्हा खापर पंजोबांनी गावकऱ्यांच्या मदतीने गाढवाची सोय केली. गाढवाला फुलांची माळा घालून जावयाची जवळपास तीन तास गावात बँडसह मिरवणूक काढली. त्यानंतर गावातील मंदिरात जावयाचं कौतुक केलं. त्याला अंगठी आणि कपडे भेट दिली. त्यानंतर गावात रंगपंचमीचा एक उल्लास पाहायला मिळाला. त्यानंतर ही परंपरा सुरूच झाली.