Dhulivandan 2021: देशभरात होळीचा उत्साह, मध्य प्रदेश, मथुरा, आसाम मध्ये पारंपारिक पद्धतीने साजरा केला धूलिवंदनाचा सण, Watch Photos and Videos
Dhulivandan 2021 (Photo Credits: ANI/Twitter)

देशभरात आज होळीचा (Holi 2021) सण साजरा केला जात आहे. काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने धार्मिक स्थळांवर हा सण साजरा केला जात आहे. तर काही ठिकाणी धुळवडीचा (Dhulivandan) खेळ रंगला आहे. यात मध्य प्रदेश (Madhya Pradesh), मथुरा (Mathura) आणि आसाम (Assam), वृंदावन (Vrindavan) मध्ये होळीचा सण साजरा करण्यात आला. धूळवडीचा सण प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी रंगांनी काही ठिकाणी फुलांनी, काही ठिकाणी भांग पिऊन तर काही ठिकाणी आपल्या धार्मिक स्थळांवर विधिवत पूजा करण्यात आली.

वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरात होळीचा उत्साह साजरा करण्यात आला.हेदेखील वाचा- Dhulivandan 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह सह या केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटद्वारे जनतेला दिल्या होळीच्या शुभेच्छा

तसेच मंदिराबाहेर भाविकांनी धुळवडीसाठी सण साजरा केला.

मध्य प्रदेशात उज्जैन येथे भाविकांनी रंगपंचमी साजरी केली.

तर आसाममध्ये पारंपारिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला.

केवळ महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याकारणाने हा उत्साह राज्यात दिसला नाही. सर्वत्र शांतता आणि धूळवड पाहायला मिळाली नाही. लोकांनी घरात राहून सरकारने दिलेल्या नियमांचे पालन केले.