मुंबईतील धारावीत आज कोरोनाचा फक्त 1 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2589 वर पोहचला, BMC ची माहिती
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान मुंबईतील धारावीत आज फक्त 1 कोरोनाचा रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2589 वर पोहचला असून 77 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच 2254 जणांना आता पर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीतील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास यश आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. तसेच महापालिकेकडून सुद्धा धारावीत दाटीवाटीने लोकवस्ती असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.

धारावीत गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या दुप्पटीचा वेग मंदावला असून नवा बळी सुद्धा गेलला नाही. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सराकरसह स्थानिक प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून कोरोनासंक्रमित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत कोविड वॉरिअर्स म्हणून काम करणारे सुद्धा या महासंकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.

मुंबईमध्ये काल कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबईमध्ये काल (4 ऑगस्ट)  709 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 56 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 873 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे.   मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 18 हजार 130 इतकी झाली आहे.