Maratha Reservation Protest in Lalbaug (Photo Credits: Twitter/ANI)

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या चांगलाच पेट घेत असून सुप्रीम कोर्टाने याला स्थगिती दिल्यानंतर हे प्रकरण आता आणखीनच चिघळल आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) या निर्णयाविरोधात मराठा समाजाच्या सदस्यांनी (Maratha Community Members) मुंबईतील लालबाग परिसरात आंदोलन केले. मात्र या आंदोलनात सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेबाबतही काही स्पष्ट शब्दांत उल्लेख केला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, आरक्षणासाठी 50 टक्केंची मर्यादा आहे. ही मर्यादा ओलांडण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी अपवादात्मक परिस्थीत कशा पद्धतीने आहे किंवा होती याबाबत स्पष्टता दिली नाही, असे म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयाविरोधात आज लालबाग परिसरात मराठा समाजाचे अनेक सदस्य सहभागी झाले होते. या आंदोलनात सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच या मराठा समाजाच्या सदस्यांनी पोलिसांना सहकार्य करत शांततामय पद्धतीने हे आंदोलन केले. Maratha Reservation: जातीय सलोखा कायम राखत मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावा, दुजाभाव नको; ओबीसी नेत्यांची राज्य सरकारकडे मागणी

राज्य सरकारने दिलेला शब्द पाळावा. मराठा आरक्षणासाठी ओबीसी वर्गाच्या आरक्षणाला हात लावू नये असं आवाहन करत जातीय सलोखा राखत सरकारने मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आहे. दरम्यान यावेळेस त्यांनी मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये दुजाभाव नको असेदेखील ठणकावून सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एकूण आरक्षण 50% च्या वर जात असल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात आणि नोकरभरतीमध्ये मराठा आरक्षण अंमलबजावणीला विरोध केला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण 5 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग केलं आहे.