महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी 6 वाजता मतदान संपेल. 288 विधानसभा मतदारसंघात मतदान(Maharashtra Vidhan Sabha Election 2024) होत आहे. मतदानासाठी 2 लाख 21 हजार 60 बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात एकूण 4 हजार 136उमेदवार आहेत. (EVM Machine Down in Pune, Kolhapur: पुणे, कोल्हापूरमध्ये मतदानादरम्यान ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड, नागरिकंचा संताप अनावर (Watch Video))
राजकीय नेत्यांपासून कलाकार, कामगारा वर्ग, विदयार्थी वर्ग सकाळपासून मतदानाच्या रांगेत उभे राहिले आहेत. ते मतदानाचा हक्क बजावत आहे. वर्षा गायकवाड, किरीट सोमय्या, विजय वडेट्टीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी १० वाजेपर्यंत जवळपास सर्वच नेत्यांनी मतदान केले आहे. त्यांच्याकडून सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Maharashtra Vidhan Sabha Voting 2024: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क; नागपूरमध्ये केले मतदान)
Mumbai, Maharashtra: BJP leader Kirit Somaiya, along with his family, casts his vote in Mumbai and says, "There is a very enthusiastic atmosphere at the polling station..." pic.twitter.com/Hjp6RkhPoF
— IANS (@ians_india) November 20, 2024
लोकशाहीच्या या उत्सवात आज सहकुटुंब सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला. मुंबई व महाराष्ट्राच्या सर्वसमावेषक विकासाचं लक्ष्य पुढे ठेवून मतदान करावं. लोकशाही अधिक भक्कम बनवण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा असं आवाहन करते.#GoOutToVote#Mumbai #Maharashtra #MaharahstraElection2024… pic.twitter.com/4dCSG72iTO
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 20, 2024
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त 45 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेतली आहे.
मतदान केंद्रावर हे पुरावे असणार ग्राह्य-
आपले नाव मतदार यादीत असेल मात्र मतदान केंद्रावर निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेले मतदार ओळखपत्र नसेल तर मतदान केंद्रावार त्याच्याशिवाय पुढील ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यामध्ये १) आधार कार्ड २) वाहन चालक परवाना ३) पॅन कार्ड ४) भारतीय पारपत्र ५) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ६) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र ७) संबंधित शिक्षक/पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ८) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मूळ प्रमाणपत्र ९) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र १०) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.