EVM Machine Down in Pune, Kolhapur: महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 साठी मतदान सुरू झाले आहे. एकाच टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी 6 वाजता मतदान संपेल. 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. पण मतदानाला सुरूवात होताच पुणे,कोल्हापूरमधील काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड (EVM Machine Down)झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील कोथरूड येथील अण्णा साहेब शाळेतील (Anna Saheb School) मशिनमध्ये बिघाड झाला बिघाड झाला. तर कोल्हापूरमध्ये विक्रम हायस्कूलमधील (Vikram High School) मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाला. सकाळी लवकर मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांचा त्यामुळे खोळंबा झाला. अनेकांनी निवडणूक आयोगाच्या या कामचूकारपणावर संताप व्यक्त केला आहे.
कोल्हापूरमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड
Maharashtra: The EVM machine at Vikram High School in Kolhapur is down due to a technical problem pic.twitter.com/ZSim9Thjus
— IANS (@ians_india) November 20, 2024
पुण्यात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड
Maharashtra: The EVM machine in Kothrud, Pune, is malfunctioning, and the machine at the Anna Saheb School center is also faulty pic.twitter.com/gcVd75ruiK
— IANS (@ians_india) November 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)