'खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे'; जितेंद्र आव्हाड यांचा कवितेतून भाजपला उपरोधिक टोला
Jitendra Awhad (Photo Credit: Twitter)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यापासून विरोधकांनी त्यांच्या टीका करण्यास सुरुवात केली. कोरोना व्हायरस संकट काळातील त्यांच्या कामकाजावर विरोधकांकडून वारंवार टीका केली जात आहे. यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कवितेतून भाजपला (BJP) उपरोधिक टोला लगावला आहे. 'खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे' असे शिर्षक असलेली कविता आव्हाड यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

या कवितेतून मुख्यमंत्र्यांनी लागू केलेल्या कठोर निर्बंधावर भाजपकडून होणाऱ्या टिकेचा आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी विश्वासात घेऊन निर्णय घेतले आहेत. मंदिर, बाजार, शाळा उघडण्याचा विरोधकांचा आग्रह होता. मात्र कोरोना वाढल्यावर पुन्हा सरकारला दोष देण्यात आला तरी शांत राहून लढत असलेल्या मुख्यमंत्र्यावर वारंवार टीका केली जाते. कोणताही बडेजाव न करता काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर विरोधक ताशेरे ओढत आहेत, असे त्यांनी कवितेत म्हटले आहे. यासोबत विरोधक टीका करत असलेल्या अनेक मुद्द्यांचा त्यांनी कवितेत उल्लेख केला आहे.

जितेंद्र आव्हाड पोस्ट:

Jitendra Awhad's Poem | (Image Credits: Facebook)

(हे ही वाचा: Jitendra Awhad On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर म्हणाले 'बघा तुमचं वजन वापरून काही मिळतं का?')

यापूर्वी देखील जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्याचे कौतुक करणारे ट्विट केले होते. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे होणे अवघड असल्याचे म्हटले होते. तसंच मुख्यमंत्री करत असलेल्या कार्याला सलाम ठोकला होता.