Jitendra Awhad On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर म्हणाले 'बघा तुमचं वजन वापरून काही मिळतं का?'
Jitendra Awhad, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियमांचे पालन करत लॉकडाऊन (Lockdown) टाळा, मास्क वापरा आणि कोरोना नियंत्रणात ठेवा. अन्यथा लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधताना दिला. यावर राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आणि जगभरातील लॉकडाऊनबाबत तिथल्या सरकारने केलेल्या उपाययोजनांची उदाहरणे दिली. यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेला महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊन टाळण्याबाबतच्या अवाहनावर टीका करताना देवेंद्र फडणीस यांनी उदाहरण देत म्हटले होते की, ''बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय. पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय. पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे. पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले''. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Live Update: पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय पण आज त्याबद्दल जाहीर करत नाही- उद्धव ठाकरे)

देवेंद्र फडणीस यांनी दिलेल्या उदाहरणांचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे. आपले केंद्र सरकार काय देणार. अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून'', असा टोलाही आव्हाड यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (शुक्रवार, 2 मार्च 2021) राज्यातील जनतेशी संवाद साधला. या वेळी कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना आणि वास्तव स्थिती याबाबत माहिती दिली.या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्याकरण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊन टाळण्यासाठी जे पर्याय आहेत ते वापरण्याचा प्रयत्न आहे. परंतू, सर्व करुनही पर्यायी मार्ग सापडला नाही तर लॉकडाऊन अटळ आहे. गेलेला रोजगार पुन्हा परत आणता येईल. परंतू, गेलेला जीव परत आणता येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळ

राज्यावर करोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट ओढावलं असून, मागील काही दिवसांपासून डोळे विस्फरायला लावणारी आकडेवारी समोर येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. यावर टाळेबंदी हा उपाय नाही हे मान्य आहे, पण त्याला पर्याय हवा आहे. दोन दिवसांत विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं. त्याचबरोबर परदेशातील केंद्र सरकारांनी केलेल्या मदतीचे दाखलेही दिले.

फडणवीसांनी दिलेल्या दाखल्यांचा समाचार घेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आव्हाड यांनी फडणवीसांचा मुद्दा खोडून काढतानाच केंद्र सरकारवरही निशाणा साधला. “…पण हे सगळं तिथल्या केंद्र सरकारनी केलं आहे. आपलं केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाहीत. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून…,” असं म्हणत आव्हाडांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.