CM Uddhav Thackeray Live Update: राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारकडून सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेतच. तरीसुद्धा अद्याप बहुतांश नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात कारवाईचे आदेश आता दिले गेले आहेत. त्याचसोबत काही ठिकाणी लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला जाणार का याबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या सर्वांच प्रश्नांची एकूणच उत्तरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या आजच्या लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना देणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला नागरिकांना घाबरुन जाऊ नका असे म्हटले आहे. त्यामुळे मी जे काही बोलते ते समजून घेण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जवळपास 1 वर्ष कोरोनाला झाले तरीही त्यापासून आपण अद्याप सुद्धा झगडत आहोत. जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत कोरोना संपेल असे वाटत होते. जर कोरोनाची परिस्थिती अशीच कायम राहिली तर लॉकडाऊन करावा लागेल का अशी शक्यता होती. त्याचसोबत नागरिकांनी आतापर्यंत नियमांचे पालन केलेच पण मध्यल्या काळात आपण थोडे शिथील झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. लग्न समारंभ, मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यक्रम यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. परंतु लॉकडाऊन बद्दल अद्याप त्यांनी कोणतेच उत्तर दिलेले नाही.
Tweet:
I cannot rule out imposing a lockdown if the current COVID19 situation prevails. People have become complacent: Maharashtra CM Uddhav Thackeray pic.twitter.com/1pPr9ahDwm
— ANI (@ANI) April 2, 2021
कोरोनाच्या रुग्णांबद्दल कोणतीही लपवालपवी केली जात नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या 500 हून अधिक कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या लॅब्स असल्याची माहिती ठाकरे यांनी लाईव्ह मध्ये दिली आहे. मुंबईतील सध्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा आठ हजारांच्या पार जात आहे. आज राज्यात 45 हजारांच्या पार कोरोनाच्या रुग्णांचा आकडा गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Tweet:
Till now, we have administered 65 lakh COVID19 vaccine doses incl 3 lakh vaccine doses yesterday. Even after vaccination, some people are getting infected because they stop wearing masks: Maharashtra CM
— ANI (@ANI) April 2, 2021
तर कोरोनाची लस घेतल्यानंतर सुद्धा नागरिकांनी मास्क घालणे अनिवार्य असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कोविड19ची लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही असे नाही. पण त्यापासूनची खातरता कमी होण्याची शक्यता आहे. रुग्णवाढ थांबण्यासाठी अद्याप कोणताही उपाय नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन हा घातक पण आपण कात्रीत सापडलो आहोत. याच पार्श्वभुमीवर विरोधी पक्षांच्या लॉकडाऊनच्या भुमिकेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. मास्क न घालण्याबद्दल शौर्य काय? यावरुन उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. जनतेच्या जीवासोबत खेळ होईल असे विरोधकांनी राजकरण करु नका अशी विनंती केली आहे. तर राज्यात कठोर निर्बंध लादले जाणार असून त्याबद्दल पुढील एक-दोन दिवसात नवी नियमावली जाहीर केली जाईल. पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय पण आज त्याबद्दल जाहीर करत नाही असे उद्धव ठाकरे यांनी अखेरीस स्पष्ट केले आहे.