Bhagat Singh Koshyari | (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेचा संघर्ष शिगेला पोहचला आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आपल्या स्थानावरून हटायला तयार नाहीत. अशात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी एक मोठे विधान केले आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी कोणताही पक्ष आपल्याकडे आला नाही,. तर आपल्याला इतरही पक्षांशी सत्तास्थापनेसंबंधीची चर्चा करावी लागेल असे राज्यपाल म्हणाले आहेत. आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)  यांनी काल, शनिवारी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये राज्यपालांनी ही माहिती दिली असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

राज्यपालांनी शनिवारी संध्याकाळी त्यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाला सांगितले की, आपण पुढील राज्याचे सरकार बनविण्याच्या दाव्यासाठी पक्ष/पक्षांची वाट पाहत आहोत. सध्याच्या 13 व्या राज्यसभेची मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधी नवीन सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या 288 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने 105 जागा जिंकल्या आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहेत. (हेही वाचा: शिवसेना पक्षाचे संख्याबळ वाढले असून उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आलेत- संजय राऊत)

केंद्रीय मंत्र्यांनी शनिवारी भाजपच्या अन्य मित्रपक्षांसह राज्यपालांची भेट घेतली. चालेल्या चर्चेत त्यांनी अमित शहा यांच्या नेतृत्वात असलेल्या पक्षाला राज्यात सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करण्याची विनंती केली. मात्र सध्या मुख्यमंत्रीपद आणि इतर महत्वाच्या खात्यांवरून शिवसेना आणि भाजपयांच्यामध्ये वाद सुरु आहेत. सत्ता स्थापनेची चर्चा अजून तरी कोणत्या निर्णयापर्यंत पोहचली नाही. मात्र सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला म्हणजेच भाजपला आधी बहुमत सिद्ध करण्याची स्नाधी दिली जाईल. त्यानंतर इतर पक्षही आपले बहुमत सिद्ध करू शकतात.