शिवसेना पक्षाचे संख्याबळ वाढले असून उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आलेत- संजय राऊत
संजय राउत (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Maharashtra Assembly Election 2019) अधिक जागा मिळवल्या असून राज्यात अजूनही सत्ता स्थापन झाली नाही. मुंख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षात वाद पेटला आहे. नुकतीच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली असून सत्तास्थापनेबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना (ShivSena) पक्षाकडे 175 आमदाराचे संख्याबळ बळ असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचाच होईल. शिवतिर्थावर शपथविधी होईल, असेही संजय राऊत त्यावेळी म्हणाले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटले तरीदेखील राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार? यावरून भाजप-शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरु झाली आहे. शिवसेना त्यांच्या मागणीवर ठाम असताना भाजपाकडून मात्र, मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावर कोणतीही तडजोडीची भूमिका घेताना दिसत नाही. यातच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांचे लक्ष आकर्षित केले आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढली आहेत. कालपर्यंत जी 170 होती, ती आज 175 पर्यंत वाढली आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतिर्थावर शपथ घेईल. महत्वाचे म्हणजे, लवकरच उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत". असे संजय राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- हे 50-50 नवीन बिस्किट आहे का? या शब्दात ओवेसी यांनी महायुतीवर साधला निशाणा

संजय राऊत यांचे ट्विट-

महायुतीमध्ये 50-50 फॉर्म्युलावरून मतभेद सरु झाली असून शिवसेनेकडून संजय राऊत यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. भापकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.