
महाराष्ट्रातील धुळे (Dhule) जिल्ह्यात विजेच्या बिला संदर्भात एक विचित्र घटना घडली आहे. ती म्हणजेच विज बिलावर असलेले नाव हे गांधी राजीव राहुल असे आहे. यामुळे आता या विजेच्या बिलाची सर्वत्र चर्चा सुरु झाली असून त्याची प्रत सुद्धा सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. धुळ्यातील माणिकनगर असा विजेच्या बिलावर पत्ता सुद्धा दिला आहे. त्याचसोबत चालु रिडिंग, मागील रिडिंग, युनिटसह अन्य विज बिलासंदर्भातील माहिती सुद्धा त्यावर दिसून येत आहे. राहुल गांधी यांच्या नावे असलेल्या विजेचे बिल हे वीज वितरण कंपनीच्या संकेतस्थळावर सुद्धा तेच नाव असल्याचे ही सांगण्यात आले आहे.
एबीपी माझा यांनी दिलेल्या या वृत्तानुसार, विज बिलावरील नाव खरे असून या नावाच्या व्यक्तीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु गांधी यांच्या घरात सध्या राहणाऱ्या शाहजराम यादव यांनी या बद्दल अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, त्यांनी गांधी यांचे घर गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी विकत घेतले आहे. परंतु विजेच्या बिलावर यादव यांनी बदल केलेलाच नाही.
तसेच यापूर्वीच वीज वितरण कंपनीने प्रॉपर्टी कार्ड नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.(Mumbai's CST Makeover: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या 1930 च्या आयकॉनिक रूपाला धक्का न लावता रूपडं पलटणार; भारतीय रेल्वेची 1600 कोटींची तरतूद)
राहुल गांधी यांच्या नावाने व्हायरल झालेले हे विज बील आता चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच माणिकनगरात नागरिकांना गांधी नावाचे इसम राहत असल्याचे सुद्धा लक्षात आले. त्याचसोबत विज बिलावरील नाव हे चुकून प्रिंट केले आहे की त्यात मुद्दामून चुका केल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.