Yearender 2020: क्वारंटाइन ते पॅन्डामिक पर्यंत यंदाच्या वर्षात COVID19 च्या पार्श्वभुमीवर आपण शिकलो हे 5 नवे शब्द
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

Yearender 2020: वर्ष 2020 ची सुरुवात होण्यापूर्वी प्रत्येकाला वाटत होते की यंदाचे वर्ष आनंदात आणि उत्साहाने भरलेले असणार आहे. मात्र वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना व्हायरस सारखे महासंकट संपूर्ण जगावर कोसळले. त्यानंतर हळूहळू कोरोना व्हायरसमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र अद्याप ही कोरोनाची परिस्थिती कायम असून त्यावरील लसीसंदर्भात जगभरातील संशोधक अभ्यास करत आहे. त्याचसोबत सर्वांचे लक्ष कोरोनावरील लसीकडे लागले आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपल्या काही नवे शब्द शिकण्यास मिळाले. तर जाणून घेऊयात ते कोणते नवे 5 शब्द आहेत.

1- लॉकडाऊन (Lockdown)

कॉलिन्स डिक्शनरी (Collins Dictionary) ने 2020 साठी लॉकडाऊन हा सर्वाधिक वेळा वापरला गेलेला शब्द म्हणून घोषित केले आहे. या शब्दाचा वापर जगभरात विविध देशात लावण्यात आलेल्या बंदीसाठी वापरला गेला. तसेच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ नये म्हणून बचाव करता येईल.

2- पॅन्डामिक (Pandemic)

प्रसिद्ध अमेरिकेतील शब्दकोश मरियम वेबस्टर ने वर्ष 2020 मध्ये आपल्या शब्दाच्या रुपात पॅन्डामिक म्हणजेच साथीचा रोगाच्या शब्दाची घोषणा केली होती. पॅन्डामिक शब्द हा मुळ लॅटिन आणि ग्रीक शब्द पॅन्डेमॉस (Pandemos) संबंधित आहे. पॅनचा अर्थ आहे की सर्व आणि डेमो म्हणजे लोक. या शब्दाचा उपयोग अशा आजारांचे वर्णन करण्यासाठी केला जातो ज्याचा अधिक प्रभाव पडतो.(Top Global Asian Celebrity 2020: आशियाई सेलिब्रिटी 2020 च्या यादीत अभिनेता Sonu Sood अव्वल स्थानावर; अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, प्रभास यांना टाकले मागे)

3-क्वारंटाइन (Qurantine)

क्रॅब्रिज डिक्शनरीने 2020 साठी त्यांचा शब्द क्वारंटाइनच्या रुपात घोषित केला. कारण त्यांच्या शब्दकोशात सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या शब्दापैकी एक आहे. या शब्दाचा आयसोलेशन सारखाच अर्थ आहे. संपूर्ण वर्षात या शब्दाचा सर्वाधिक वेळा उपयोग केला गेला आहे. मात्र आयसोलेशन च्या विरुद्ध क्वारंटाइन म्हणजेच लोकांना वेगळे ठेवणे आणि त्यांच्यावर बंदी घालणे.

4- कंन्टेंमेंट झोन (Containment Zone) 

कंन्टेंटमेंट झोन म्हणजे कोरोना व्हायरसच्या काळात वापरला जाणारा आणखी एक शब्द आहे. याचा वापर भौगोलिक क्षेत्राचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. जेथे कोरोनाचे संक्रमण दिसून येते. त्यानुसार त्या परिसरावर बंदी घातली जाते. कंन्टेंटमेंट झोनचा अर्थ आहे की कोरोना व्हायरसचा आजार किंवा नैसर्गिक आपत्तीचा विस्तार होण्यावर प्रतिबंद घालणे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रभावित परिसराची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी करण्यात आली होती.

5-पीपीई (PPE)

पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच व्यक्तीगत सुरक्षिततेसाठी वापरले जाणारे विशेष कपडे. ज्याचा वापर आरोग्यासंबंधित धोक्यापासून बचाव करण्यासाठी केला जातो. पीपीई किटमुळे आपल्या शरिराचे पूर्णपणे रक्षण केले जाते. कोरोना व्हायरसच्या काळात पीपीई किटचा वापर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त लोकांनी सुद्धा केला जातो.

दरम्यान, या शब्दांच्या व्यतिरिक्त कोविड19 च्या काळात सोशल डिस्टंन्सिंग सारख्या शब्दांचा वापर केला गेला. त्याचसोबत सॅनिटायझर आणि हँन्ड सॅनिटायझर सारखे शब्द ही वापरले गेले. या शब्दांचा वापर कोरोनाच्या सुरुवातीपासून केला जात आहे.