प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

यंदाचे हे वर्ष कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) अनेकांना घरातच काढावे लागले. त्यामुळे लोकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनाचा सामना करावा लागत नसला तरी घरात राहून थोड्याफार प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशा स्थितीत जोडप्यांमधील सेक्स लाईफ (Sex Life) बोअरिंग होत आहे. त्यामुळे सेक्स लाईफमधील आनंद प्रदीर्घ काळासाठी टिकून राहण्यासाठी, तुमच्या सेक्स लाईफ सुधारण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. यात जोडप्यांमधील संवाद ही जितकी महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर अन्य ही काही खास गोष्टी आहेत.

त्यामुळे घरात असताना देखील तुम्हाला सेक्स लाईफ रटाळ झाली आहे असे वाटत असेल तर काही इंटरेस्टिंग गोष्टी करुन तुम्ही ती छान बनवू शकता. त्यासाठी पुढे दिलेल्या गोष्टींकडे थोडे लक्ष द्या.

1. शारीरिक ओढ प्रस्थापित करा: जर तुमच्यात आपल्या पार्टनरबद्दल शारीरिक ओढ नसेल तर तुमची सेक्स लाईफ चांगली बनू शकणार नाही. यासाठी तुम्ही चुंबन घेणे, एकमेकांना मिठी मारणे यांसारख्या गोष्टी करुन शारीरिक ओढ प्रस्थापित करु शकता.

2. ल्यूबचा वापर करा: जर तुमच्या योनीजवळ सातत्याने सुकेपणा जाणवत असेल तर तुम्ही चिकट द्रव वा जेलसारखे असणा-या ल्यूबचा वापर करा. ज्यामुळे वेदनादायक सेक्सपासून तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. हेदेखील वाचा- Ejaculate Without Sexual Intercourse: संभोग न करताही पुरुषांना मिळू शकतो परमोच्च आनंद; Sex शिवाय 'ते' सुख मिळवण्यासाठी जाणून घ्या सोपे मार्ग

3. स्पर्शचा चांगला अभ्यास करा: सेक्स तज्ज्ञांकडून स्पर्श आणि त्यामुळे शरीरात होणारे बदल याचा चांगला अभ्यास करा. याविषयी माहिती देणारे बरीच पुस्तके वा एज्युकेशनल व्हिडिओ तुम्हाला मिळतील. त्याच्या आधारावत तुम्ही स्पर्श आणि त्या मागच्या भावना याचा अभ्यास करु शकाल.

4. वेगवेगळ्या सेक्स पोजिशन्स ट्राय करा: नेहमीच त्याच त्याच सेक्स पोजिशन्सचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर मिशनरी, स्प्रेड इगल, स्पूनिंग, काऊ गर्ल, डॉगी स्टाईल यांसारख्या काही हटके पोजिशनस् ट्राय करा.

5. फोरप्ले ला महत्व द्या: फोरप्ले हा सेक्सदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावतो. सेक्सचा आनंद दीर्घकाळ टिकण्यासाठी देखील तो मदत करतो. त्यामुळे फोरप्ले चांगले होईल याला प्राधान्य द्या.

या गोष्टी जरी तुम्हाला सर्वसामान्य वाटत असल्या तरीही सेक्स लाईफ सुधारण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत हे ध्यानात ठेवा.

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा.)