जर तुम्ही जवळपास 20 वर्षांचे किंवा त्याहून अधिक वयाचे पुरुष असाल, ज्यांनी पूर्वी कधीही संभोग (Sex) केला नाही तर तुम्हाला सेक्स न करताही परमोच्च आनंद (Ejaculation) घेता येईल. असे बरेच लोक आहेत ज्यांना सेक्स न करता आनंद मिळवायचा असतो. तर ते शक्य आहे. पुरुष वयात आल्यावर त्यांच्या मनामध्ये सेक्सची भावना जागृत होते, मात्र कधी कधी पुरुष सेक्स करण्याला घाबरतात किंवा कधी कधी त्यांच्यामध्ये तेवढी हिम्मत नसते अशावेळी काही सोपे उपाय कामी येऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर पुरुष संभोग करण्याऐवजी हस्तमैथुन करून परमोच्च आनंद मिळवू शकतील का? असा प्रश्न एका वापरकर्त्याने एका वेबसाइटवर उपस्थित केला होता. या प्रश्नात त्याने हे उघड केले आहे की त्याने कधीही कोणाशीही लैंगिक संबंध ठेवले नाही.
एखाद्या व्यक्तीला लैंगिक उत्तेजन मिळवण्याचे आणि स्वतःला आनंद देण्याचे अनेक मार्ग आहेत. यात लैंगिक संबंध किंवा सेक्सचा समावेश नाही. पॉर्न पाहण्यापासून ते एक कामुक कादंबरी वाचण्यापर्यंत, असे काही पर्याय आहेत ज्यातून आपल्याला लैंगिक उत्तेजन मिळू शकते.
पॉर्न पाहणे- आपला मूड काय आहे यावर अवलंबून असे आपण पॉर्न व्हिडिओ पाहू शकता. बहुतेक लोकांसाठी हा सर्वात पहिला उपलब्ध पर्याय आहे. यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा तो प्रकार निवडून स्वतःला आनंद देऊ शकता. मात्र लक्षात घ्या पॉर्नचा अतिरेक टाळा.
कामुक कथा अथवा कादंबरी- सध्या ऑनलाइन कामुक कादंबर्या किंवा कथा उपलब्ध आहेत, ज्याद्वारे तुम्ही लैंगिक सुखाचा आनंद मिळवू शकता. अशा कादंबऱ्या वाचून तुम्ही तुमच्या मनामध्ये याचे चित्र उभे करता व ते तुम्हाला आनंद देईल. (हेही वाचा: मिशनरी, डॉगी स्टाईलसह 'या' 5 हॉट सेक्स पोजिशन्स वजन घटविण्यास येतील कामी)
हॉट बॉडी मसाज - वीर्यस्खलन होण्याचा आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे, हॉट बॉडी मसाज. शहरांमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी या प्रकारची मसाज सेवा देतात. यामध्ये तुमच्या प्रायव्हेट पार्टसनाही मालिश केली जाते व ते तुम्हाला उत्तेजित करण्यासाठी पुरेसे आहे. यामुळे आपण स्वत: ला मास्टरबेट किंवा सेक्स टॉयच्या अतिरेकापासून वाचवू शकता.
स्वतःच्या अवयवांशी खेळणे- बाकी काहीच पर्याय नसतील तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. स्वतःच्या प्रायव्हेट पार्टसशी खेळून तुम्ही लैंगिक आनंद मिळवू शकता. यामध्ये तुम्ही उशीसारख्या मऊ गोष्टीवर आपले प्रायव्हेट पार्टस घासून लैंगिक आनंद मिळवू शकता.
(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा.)