Parental Pressure Affect Young Athletes: मुंबईतील 16 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नुकत्याच घडलेल्या एका घटनेने युवा क्रीडा क्षेत्रातील वाढत्या चिंतेवर प्रकाश टाकला आहे. एका महिला खेळाडूने दावा केला आहे की, तिच्या प्रतिस्पर्ध्याच्या आईने तिला धमकावले. खेळातील ब्रेकदरम्यान वॉशरूम गेल्यावर हा प्रकार घडला. ज्याचा दृश्य पुरावाही उपलब्ध नाही. घडल्या प्रकारामुळे पीडित खेळाडू घबरुन तर गेलीच आहे. परंतू या निमित्ताने स्पर्धात्मक खेळातील काळी बाजूही (Dark Side of Competitive Sports) पुढे आली आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रकार केवळ प्रतिस्पर्धी खेळाडूच्या पालकांकडूनच नव्हे तर अनेकदा खेळाडूच्या स्वत:च्या पालकांकडूनही होतो आहे. पालकांच्या दबावास (Parental Pressure) विशेषत: बॅडमिंटन, टेनिस, पोहणे, नेमबाजी आणि बुद्धिबळ यांसारख्या वैयक्तिक क्रीडाप्रकारांमध्ये खेळणारे खेळाडू बळी पडत असल्याची क्रीडा वर्तुळात चर्चा आहे.
पालकांचा दबाव आणि त्याचे परिणाम
खेळाडूंवर असलेल्या पालकांच्या दबावाबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. या वृत्तात दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, एमपॉवर, मुंबईतील मानसिक आरोग्य सुविधा येथील क्रीडा मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सानिका दिवेकर स्पष्ट करतात की, "अनेक तरुण खेळाडूंना त्यांच्या पालकांकडून मैदानापेक्षा जास्त दबाव जाणवतो. पालक अनेकदा त्यांचे कठोर टीकाकार बनतात. ज्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडते. विशेषतः नंतर मी मुलांना असे म्हणताना ऐकले आहे की त्यांचे पालक अधिक समजूतदार आणि आश्वासक असावेत. क्रीडा मानसशास्त्रज्ञ लक्ष वेधताना सांगितात की, ही समस्या दोन कारणांमुळे गंभीर (विशेषतः भारतामध्ये) आहे. पहिले म्हणजे, अनेक भारतीय पालक त्यांच्या मुलांना स्वतःचा विस्तार म्हणून पाहतात, त्यांच्या न सुटलेल्या महत्त्वाकांक्षा त्यांच्यासमोर मांडतात. दुसरे, अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स आणि जपानी टेनिस स्टार नाओमी ओसाका यांनी त्यांच्या संघर्षांबद्दल उघडपणे चर्चा करूनही, मानसिक आरोग्याला अजूनही शारीरिक आरोग्याच्या बरोबरीने प्राधान्य दिले जात नाही, असे सांगतात. (हेही वाचा, Delhi 16 Years Olds Suicide: पालकांच्या अपेक्षा पुर्ण करू शकत नसल्याच्या नैराश्यातून 16 वर्षीय मुलाची आत्महत्या)
पालकांचा जास्त सहभाग
क्रीडा मानसशास्त्र अभ्यासक आणि या विषयातील तज्ज्ञ सांगतात की, भारतात पालक जास्त गुंतलेले असतात. बहुतेक वेळा ते प्रशिक्षकाला प्रशिक्षण देतात किंवा प्रत्येक सामन्यासाठी उपस्थित राहण्याची त्यांची इच्छा असते. या अति-गुंतवणुकीमुळे मुले त्यांच्याबद्दल अधिक विचार करू लागतात. ज्यामुळे कामगिरी आणि ॲथलीट म्हणून त्यांच्या वाढीस अडथळा निर्माण होऊ शकतो. पालनपोषण आणि संगोपण यात एक बारीक रेषा आहे. (हेही वाचा, Bedtime Habits and Screen Time: झोपण्याच्या सवयी आणि वाढता स्क्रीन टाइम म्हणजे 'द सायलेंट रिलेशनशिप किलर')
दृष्टीकोन बदलणे आवश्यक
जेव्हा क्रीडा मानसशास्त्राचा विचार केला जातो तेव्हा पिढ्यानपिढ्याचे वेगवेळे दृष्टीकोण पाहायला मिळतात. प्रशिक्षणादरम्यान पालकांनी हस्तक्षेप करू नये, असे मत अनेक प्रशिक्षक व्यक्त करतात. मुलांवर लहान वयातच दबाव सुरू होतो. एका उदाहरणात मुंबईतील आठ वर्षांच्या टेनिसपटूचा समावेश आहे, ज्याला झोपेच्या समस्यांमुळे समुपदेशकाकडे पाठवण्यात आले होते. मुलाला टेनिसची आवड होती परंतु साप्ताहिक रँकिंग चार्ट तयार करण्यासह त्याच्या आईने त्याच्यावर टाकलेल्या दबावामुळे तो भारावून गेला. अखेरीस, त्याने खेळ सोडला. (हेही वाचा, Loneliness Impacts Men's Lives and Work: पुरुषांच्या काम आणि जीवनावर एकाकीपणा परिणामकारक; संशोधनात अनेक धक्कादायक खुलासे)
विशेष म्हणजे, मानसशास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की ग्रामीण भागातील पालकांचा पालकत्वाकडे शहरांच्या तुलनेत अधिक समग्र दृष्टीकोन असतो. भारतातील अनेक उच्चभ्रू-स्तरीय खेळाडू ग्रामीण पार्श्वभूमीतून का येतात हे यावरून स्पष्ट होऊ शकते.