Kiss Day Significance | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

Kiss Day 2020 Significance: व्हॅलेंटाईन सप्ताहात किस डे (Kiss Day 2020) हा शेवटून दुसऱ्या क्रमांकावर असतो. व्हॅलेंटाईन विक (Valentine Week 2020) साजरा करणारे कपल या दिवशी खास उत्साहात असते. या दिवशी कपल एकमेकांना किस करते. खरे म्हणजे एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केलेले कोणतेच जोडपे किस करण्यासाठी कदाचित केस डे उजाडेपर्यंत वाट पाहात नसावे. परंतू, प्रेमिकांची दुनियाच न्यारी. त्यामुळे त्यांना काही गोष्टी करण्यास फक्त कारणच पुरेसे. कपल्सकडून एकमेकांप्रती असलेल्या भावाना या दिवशी अधिक उत्तेजीतपणे व्यक्त केल्या जातात. या भावना व्यक्त करण्यास किस महत्त्वाची भूमिका निभावतो. अर्थात पार्टनरची संमती असेल तर किस करण्यासाठी पार्टनर वेळ घालवत नाही.

किस दिन महात्म्य

व्हॅलेंटाईन सप्ताहात 12 फेब्रुवारीला किस डे असतो. प्रेमी युगुलांकडून 12 फेब्रुवारी किस डे म्हणून साजरा केला जातो. हा तसा काहीसा विचित्रच डे. परंतू, काही लोक हा साजरा करतात खरे. या दिवशी ही प्रेमू युगुलं म्हणजेच कपल्स एकमेकांचे चुंबन घेतात. चुंबन ही प्रेमाची एक मुख भाषा मानली जाते. त्यामुळे अनेक कपल्स आपल्या प्रेमाला शारीरिक पातळीवर उत्कटतेने नेण्याची सुरुवात चुंबनापासून करतात.

चुंबन म्हणजे काय?

खरे म्हणजे चुंबन या प्रक्रियेची विशिष्ठ अशी व्याख्या करता येत नाही. त्याचे प्रकारही अनेक आहेत. परंतू, काही लोकांच्या मते आपल्या जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या ओठांनी त्याच्या ओठावर किंवा शरीरावर हलकासा दाब देणे म्हणजे चुंबन. भारतात चुंबन घेऊन प्रेम व्यक्त करण्याची फारशी पद्धत नाही. परंतू, अनेक देशांमध्ये चुंबन घेऊन एकमेकांप्रती आपले प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. त्यामुळे चुंबन हा काही ठिकाणी सांस्कृतित संदर्भ घेऊनही येतो. चुंबन हे कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या स्थितीत घेतले आहे त्यावरुन त्याचे विविध अर्थ निघतात.

चुंबन दिवस इतिहास

चुंबन दिवसाचा विशिष्ठ असा इतिहास मिळत नाही. पण, प्रेम या संकल्पनेत त्याची पार्श्वभूमी आढळते. व्हॅलेंटाईन विकमध्येही त्याचा काहीसा संदर्भ आढळतो. कदाचित म्हणूनच या सप्ताहात कपल्स किस डे साजरा करत असावेत.

दरम्यान, चुंबन या अविष्काराबद्दल विशिष्ठ असा तपशील मिळत नाही. परंतू, इतिहासात डोकावले तर काही धर्म, धर्मीक साहित्य किंवा विचारवंत, इतिहासकारांनी त्यावर भाष्य केलेले पाहायला मिळते. जसे की, भारतात वैदिक संस्कृतिक काळात चुंबनाचा संदर्भ सापडतो. वात्सायनाच्या कामसूत्र या ग्रंथातही चुंबनाचा आधार मिळतो. फ्रन्समध्येही 6 व्या शतकात चुंबनावर चर्चा झाल्याचा धागा मिळतो.