World Hypertension Day: फिट राहणे हाच आहे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा रामबाण उपाय

'उच्च रक्तदाब दिना' निमित्त ह्या समस्येची लक्षणे काय आणि नेमकी काय काळजी घेतली पाहिजे

आरोग्य Poonam Poyrekar|

Blood Pressure Monitor (Photo Credits: Pixabay)

जागतिक उच्च रक्तदाब दिन(World Hypertension Day): घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे मुंबईकरांचे जीवन हे खूपच धकाधकीचे आणि त्रासदायक बनत चालले आहे. आपल्याला कुटूंबाला चांगले आयुष्य देण्यासाठी हा मुंबईकर अहोरात्र मेहनत करत असतो. त्यामुळे त्याला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही. ज्याचा परिणाम म्हणून आज अनेकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या दिसू लागलीय. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 'उच्च रक्तदाब दिना' निमित्त ह्या समस्येची लक्षणे काय आणि नेमकी काय काळजी घेतली पाहिजे हे सांगणार आहोत..

उच्च रक्तदाबाची कारणे:

1. मानसिक ताणतणावांचा आपल्या रोजच्या जीवनशैलीवर, आपल्या शरीरावर विपरित परिणाम होत असतो. एखादं वेळेस आपल्याला शारीरिक कामाचा त्रास होणार नाही, पण मानसिक ताणतणावांचा सरळ आपल्या रक्तदाबावर परिणाम होतो

Viral Video: दोन आजींची भररस्त्याच मारामारी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना
Close
Search

2. मद्यपान करणा-यांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते.

3. ध्रूमपान करणा-या म्हणजेच तंबाखू, गुटखा यांसारख्या पदार्थांचे सेवन करणा-या लोकांमध्ये उच्च रक्तदाब आढळून येतो. कारण तंबाखूत निकोटीन आणइ कार्बन मोनोक्साइड ही विषारी तत्वे असतात. ज्यामुळे नॉरेअॅड्रिनालिन या स्त्रावाचे प्रमाण वाढते आणि रक्तदाब देखील वाढतो.

4. खाण्याचा मिठाचा वापर जास्त करणा-यांमध्येही उच्च रक्तदाब आढळून येतो.

5.तसेच ज्या पालकांना उच्च रक्तदाब असतो, त्यांच्या पाल्यांनाही आनुवंशिकतेमुळे ही समस्या निर्माण होते.

5. वजन जास्त असणे

6. नियमित व्यायाम किंवा शरीराची हालचाल न करणे

7. आहारात जंक फूड व शीतपेयांचे प्रमाण अधिक असणे

8. खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याची वेळ नियमित नसणे

उच्च दाबाची लक्षणे:

1. सतत डोके दुखणे

2.छातीत जडपणा येणे

3. श्वास घेण्यास त्रास होणे

4. अचानक घाम येणे

5.चक्कर येणे

6. रक्तदाब वाढल्यास कमी दिसणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, हातापायावर सूज येणे, मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे, किडनी निकामी होणे, ह्रद्यविकाराचा झटका येणे यांसारखे संभाव्य लक्षणे दिसतात.

काय काळजी घ्याल:

1. नियमित किमान अर्धा तास चालणे किंवा व्यायाम करणे गरजेचे आहे.

2. उच्च रक्तदाबाचे निदान झालेल्या रुग्णांनी नियमित उपचार घेणे आवश्यक आहे

3. वयाची पस्तिशी ओलांडल्यानंतर दरमहा रक्तदाबाची तपासणी करणे आवश्यक आहे

4. ध्रूमपान आणि मद्यपान न करणे कधीही चांगले

5. शक्यतोवर खाण्याच्या वेळा आणि झोपण्याची वेळ नियमित ठेवणे खूपच फायदेशीर

6. बाहेरील खाद्यपदार्थ, जंक फूड, शीतपेय अतिरेक न करणे

7. खाण्यातील मीठाचे प्रमाण शक्य होईल तितके कमी करणे

8. वजन जास्त वाढू न देण्यासाठी स्वत:ला फिट ठेवणे फार गरजेचे

विसरण्याची सवय असेल तर दररोज करा व्यायाम!

उच्च रक्तदाब हा आजार केवळ औषधाने नियंत्रित राहत नसून यासाठी जीवनशैलीशी निगडित आहार, व्यायाम इत्यादींत बदल करणेही आवश्यक आहेत. अनेकदा रुग्ण वर्षांनुवर्षे औषधे घेत राहतात, परंतु त्यांना फारसा फरक पडत नाही. याचे हे एक कारण म्हणजे काही रुग्ण औषधांमध्ये सातत्य न ठेवता वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे बंद करतात त्याचा परिणाम पुढे गंभीर आजारात होतो. म्हणूनच आज जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त आम्ही एकच सल्ला देऊ शकतो, तो म्हणजे नियमित व्यायाम करा, योग्य तो आहार घ्या आणि धूम्रपान व मद्यपानापासून शक्य तो दूरच रहा.

(सूचना: वरील आर्टीकलचा उद्देश हा माहिती देणे हा आहे. यास वैद्यकीय

सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला

घेणे आवश्यक आहे.)

Poonam Poyrekar|

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change