प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

माणसांना काही वेळेस वस्तु किंवा एखादी गोष्ट विसरण्याची सवय असते. त्यामुळे आपण नेमकी कोणती गोष्ट कुठे ठेवली किंवा ती गोष्ट आपल्या लक्षात राहत नसल्याची स्थिती बहुधा व्यक्तींमध्ये दिसून येते. जर तुम्हाला सुद्धा विसरण्याची सवय असेल तर दररोज व्यायाम करा.

एका संशोधनाच्या अभ्यासक्रमानुसार जास्त वय असलेल्या व्यक्तिंना 'अल्जाइमर' (Alzheimer) या आजाराचे लक्षण दिसून येण्यास सुरुवात होते. अशा रुग्णांनी जर दररोज थोडा व्यायाम केल्यास त्यांची स्मरणशक्ती व्यवस्थित राहण्यास मदत होते. संशोधनानुसार असे समजले की, आरोग्य सुधारण्यासाठी आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.

अमेरिकेतील रश विश्वविद्यालयाच्या एरोन एस बुचमैन यांनी सांगितले की, मृत्यूच्या दारावर येऊन ठेपलेल्या काही व्यक्तिंशी दोन वर्षापूर्वीच्या आरोग्याचा अभ्यास केला. त्यानंतर मृत्यू झाल्यानंतर त्याच व्यक्तिच्या आरोग्याचा अभ्यास केला. यावरुन मानसिक संतुलन आणि तंदुरुस्त आरोग्यासाठी व्यायाम हा एक उपाय असल्याचे अभ्यासपूर्व सिद्ध झाले आहे.

संशोधनकर्त्यांनी अल्जाइमर आजार हा डोक्याशी निगडीत असून शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी स्मरणशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे.