जागतिक श्रवण दिन (World Hearing Day) प्रतिवर्षी 3 मार्च या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील नागरिकांच्या बहिरेपणा या समस्येबाबत जगृकता निर्माण केली जाते. एका संशोधनात पुढे आले आहे की, अधिक लठ्ठ असणाऱ्या नागरिकांमध्ये बहिरेपणाची समस्या अधिक मोठ्या प्रमाणावर आढळते. विस्कळीत जिवनशैली यामुळे अलिकडील काळात लोकांमध्ये लठ्ठपणा वाढल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, 2007 मध्ये पहिल्यांदा जागतिक पातळीवर 'हियर केयर' (Hair Care) दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून बहिरेपणाविरुद्ध एक मोहिमी राबवली जाते. या खास दिनानिमित्त बहिरेपणा आणि मुकेपणा समस्या आणि उपाय याबाबत प्रसिद्ध ऑडियोलॉजिस्ट-स्पीच थेरेपिस्ट सना जेब (Assistant Professor Nair Hospital) यांनी दिलेली ही माहिती.
ऐकू कमी येणे अथवा बहिरेपण ही एक अशी अवस्था आहे ज्यामुळे व्यक्ती आपली ऐकण्याची क्षमता गमावतो. कधी कधी हा रोग अनुवांशिक कारणांमुळे किंवा जन्मावेळी निर्माणझालेल्या काही समस्यांमुळे निर्माण होतो. कानात प्रदीर्घ काळ राहिलेल्या संक्रमणामुळेही ही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. कधी कधी वाढते वय, कामाची वेगळी पद्धत, ऑटो टॉक्सिक औषधे आणि सातत्याने कानात विशिष्ट प्रकारचा आवाज आदळणे आदी कारणांमुळे बहिरेपणाची समस्या निर्माण होते, असे सांगतात. (हेही वाचा, Children Health Tips: लहान बाळाचे पहिल्यांदा कान टोचल्यावर कशी घ्याल काळजी; वाचा घरगुती टिप्स)
बहिरेपण अथवा कमी ऐकू येण्याची प्रमुख कारणे
- अनुवंशिकतेमुळे आईच्या गर्भातूनच ही समस्या निर्माण होण्याची शक्यता
- आई किंवा वडील यांपैकी एकामध्ये असलेली समस्या मुलांमध्ये उतरण्याची शक्यता
- गोंगाट अथवा तीव्र आवाजात एकाच ठिकाणी प्रदीर्घ काळ काम करणे (उदा. कारखाने, ट्रॅफीक, विमान, रणगाडे यांचे सानिध्य)
- नजरचुकीने अथवा काही कारणांमुळे कानात अनावश्यक वस्तू चुकीच्या पद्धतीने खुपसली जाणे. ज्यामुळे कानाचा पडता फाटण्याची शक्यता अधिक असते.
- वाढते वय, वार्धक्य, (साधारण 60 वर्षांवरील व्यक्तीमध्ये ही समस्या आढळते)
- काही लोकांमध्ये 60 वर्षांनंतर लेगेचच बहिरेपणा किंवा ऐकू कमी येण्याची समस्या निर्माण होते.
- काही लोक वयाच्या नव्वदीतही ऐकण्याची क्षमता कायम ठेवतात.
- हियरिंग लॉस म्हणजे काय? हियरिंग मशीन कधी वापरावे?
भारतात जवळपास 6 लाखांहून अधिक लोक सिग्नीफिकंट ऑडिटरी लॉस पीडित म्हणून ओळखले जातात. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, प्रत्येक 1 हजार मुलांमध्ये 4 मुले ही गंभीर अथवा अति गंभीर हियरिंग लॉसने ग्रस्त असतात. सांगतात असा मुलांमध्ये एैकू कमी येण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी सर्वात आधी ऑडियोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ऑडियोलॉजिस्टच सांगू शकतात की, कानात बहिरेपणा आणि डिग्रीची मर्यादा किती आहे. जर आपल्या दोन्ही कानात बाईनॉरल हियरिंग लॉस आहे तर बईनॉरल (दोन्ही कानात) मशीन लावणेच आवश्यक असेल. मात्र, एकाच कानात ही समस्या असेल तर ऑडियोलॉजिस्ट च्या सल्ल्यानेच कोणतेही पाऊल पुढे टाका.
वर्ल्ड हियरिंग डे निमित्त खास संदेश
ऑडियोलॉजिस्ट-स्पीच थेरेपिस्ट सना जेब (Assistant Professor Nair Hospital) यांनी सांगितले की, खरेतर लोक आपल्या कानाकडे काहीच लक्ष देत नाहीत. काही लोक पार्लरमध्ये जातात तेथे ते कानाची वॅक्स साफ करतात. त्यांना मी सांगू इच्छिते कीपार्लरमध्ये विविध धातूंच्या उपकरणांचा वापर केला जातो. ज्यामुळे कानाच्या पडद्याला मोठे नुकसान पोहोचते. त्यापेक्षा हे नक्कीच चांगले आहे की, एका मऊ कपड्यानेच कानातील अतिरीक्त वॅक्स काढावा. लहान मुलांच्या आईला सांगू इच्छिते की, जर आपल्या मुलाची ऐकण्याची क्षमता कमी आहे असे लक्षात आले तर मुलाची योग्य डॉक्टरकरुन तपासणी करा. कारण लहान वयातच मुलाचा विकास आणि वाढीचे दिवस असतात. प्रौढ व्यक्ती अथवा मोठे मुल आपली समस्या सांगू शकते. पण लहाण मुलांना ही समस्या सांगता येत नाही.