भारतात कोणती महिला किती वेळा होऊ शकते Surrogate Mother? जाणून घ्या काय सांगतो कायदा
Pregnant women | (Photo Credit: Pixabay)

बॉलिवूड मधील अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने नुकतीच घोषणा करत ती सरोगेसी आई होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर तिला आणि पत्नी निक जोनस यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या गेल्या. पण भारतीयांना प्रश्न पडला आहे की, स्वत: च्या पोटात मुल वाढवण्याऐवजी सरोगेसी पद्धतीने ते कसे आई-वडिल होऊ शकतात? भारतात सर्व नागरिकांना आपल्या इच्छेनुसार मुल जन्माला घालण्यासाठी कोणतेही बंधन नाही. मात्र सरोगेट मदर (Surrogate Mother) होण्यासाठी भारतात काही नियम कायदे आहेत. त्यामुळे हे सुद्धा जाणून घेणे महत्वाचे आहे की, त्या कोणत्या महिला असतात ज्या सरोगेट मदर होतात. त्याचसोबत एखादी महिला किती वेळा सरोगेट मदर होऊ शकते हे सुद्धा जाणून घेणे महत्वाचे आहे.

सेंटर ऑफ सायन्स अॅन्ड रिसर्चचे निर्देशक आणि सरोगेसी संबंधित भारत सरकारच्या महिला-बालकल्याण विकास मंत्रालयाला काही वेळा आपल्या सिफारशी आणि रिपोर्ट सुपुर्द केलेल्या डॉ. रंजना कुमारी यांनी सरोगेसी मदर बद्दल अधिक माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, सरोगेसी मदर म्हणजे एखादी महिला जी मुल वाढवण्यास असमर्थ असल्याने एखाद्या दुसऱ्याच महिलेच्या गर्भातून  आलेले मुल घेते. ही एक वैद्यकीय प्रक्रिया असून सरोगेट आई आणि आई-वडिल होण्यास इच्छुक असलेल्या दांम्पत्यांना यामधून जावे लागते. तर ही वैद्यकिय प्रक्रिया असल्याने त्याला कायद्यात रुपांत करण्यात आले असून त्याचा दूरउपयोग होऊ नये हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. तसेच ज्या महिलेच्या गर्भातून मुल दिले जाणार तिच्यावर अन्याय होऊ नये आणि इच्छुक दांम्पत्यांना ते मुल मिळावे असा हा त्यामागील उद्देश आहे. (आता QR कोडच्या सहाय्याने खऱ्या-बनावट औधषांचा करता येणार तपास, पुढील वर्षात लागू होणार नवा नियम)

डॉ. रंजना यांनी असे म्हटले की, भारतात प्रत्येक महिला सरोगेट मदर होऊ शकत नाही आणि सरोरेगीच्या माध्यमातून कोणत्याही महिलेला मुल मिळत नाही. भारतात कमर्शियल सरोगेसीवर पूर्णपणे बंदी आहे. व्यवसायाच्या रुपात गर्भ भाड्यावर देऊ शकत नाही. यापूर्वी असे दिसून आले आहे की, गरीब महिला आर्थिक तंगीमुळे सरोगेसीचा मार्ग स्विकारत होत्या. पण आता त्यावर ही पूर्णपणे बंदी आहे. फक्त परोपकार किंवा सामाजिक हितासाठीच सरोगेसीच्या माध्यमातून मुल वाढवण्यास परवानगी आहे. त्याचसोबत ज्यांना वैद्यकिय कोणतेही आजार नाहीत तेच सरोगेसी आई-वडिल होऊ शकतात.  तसेच सुदृढ महिलांकडे त्या फिट असल्याचे सर्टिफिकेट असणे हे गरजेचे आहे.  यासाठी केंद्र सरकार सरोगेसी रेग्युलेशन बिल 2021 घेऊन येणार आहे. यामध्ये अधिक कठोरपणे कायदा लागू करण्याची गरज आहे.

आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिले असता कोणतीही महिला अधिकाधिक तीन वेळा आई होऊ शकते. यामध्ये सरोगेसी पद्धत असो किंवा स्वत:च्या गर्भातून मुल वाढवणे असो. जर एखाद्या महिलेला आधीच एक मुल असेल तर ती दुसऱ्यांचा सरोगेसी मदर होऊ शकते. तसेच दोन मुलांची आई असेल तर ती तिसऱ्या मुलासाठी सरोगेसी मदर होऊ शकते. तसेच तीन मुल असल्यास आणि महिलेला आणखी मुल हवे असेल तर ती सरोगेसीच्या माध्यमातून मुल घेऊ शकते. सरोगेसी ही गुंतागुंतीची प्रक्रिया नसून ती एक सामान्य गर्भावस्था असते.