Benefits of Yoga: दुर्धर कंबरदुखी दूर करण्यासाठी योगा ठरत आहे प्रभावी, अभ्यासातून निष्पन्न
Back Pain (Photo Credit: Pixabay)

कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांची लाईफस्टाईल बदलली आहे. वर्क फ्रॉम होम, तासनतास कंप्युटरसमोर काम, तसेच खाण्यापिण्याच्या वेळेत झालेला बदल आणि शरीराची हालचाल कमी होत असल्याने शरिरासंबंधित अनेक समस्या उद्भवत आहेत. तसेच या काळात प्रचंड लोकांना कंबरदुखीचा त्रास जाणऊ लागला आहे. यातच नवी दिल्लीतील एम्स येथील शरीरशास्त्र विभागाच्या अतिरिक्त प्राध्यापिका डॉ. रेणू भाटिया यांनी आपले सहकारी डॉ राजकुमार यादव आणि डॉ श्री कुमार व्ही, यांच्यासह कंबरदुखीच्या जुनाट दुखण्यावर योगाभ्यासाचा काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी संशोधन केले. दुर्धर कंबरदुखी दूर करण्यासाठी योगाभ्यासाचा प्रभावी उपयोग होत असल्याचे अभ्यासातून निष्पन्न

योगाभ्यासाबाबत आतापर्यंत करण्यात आलेले अध्ययन, रुग्णांचे अनुभव आणि त्यांना होणारी वेदना तसेच, आजारामुळे आलेली अक्षमता यात योगाभ्यासामुळे झालेली सुधारणा आणि त्यामुळे, त्यांच्या जीवनमनात झालेले सकारात्मक बदल, यावर आधारित असते. योगाभ्यासाच्या परिणामांचा अभ्यास करणारे संशोधक, ज्यांनी वेदनेचे प्रमाण,वेदना सहन करण्याची क्षमता आणि शरीराची लवचिकता, यांचेही मोजमाप केले होते, त्यांना अभ्यासाअंती असे आढळले आहे की योगाभ्यासामुळे पाठ-कंबरदुखीचे दुर्धर दुखणे असलेल्या रूग्णांची वेदना कमी झाली, वेदना सहन करण्याची क्षमता वाढली आणि शरीराची लवचिकताही वाढली आहे. हे देखील वाचा- Covid-19 Delta Plus Variant: काय आहे कोविड-19 चे नवे डेल्टा प्लस वेरिएंट? जाणून घ्या सविस्तर

दुर्धर कंबरदुखीचा त्रास असलेल्या रुग्णांना चार आठवडे योगाभ्यास करुन त्यांच्या दुखण्यात तसेच दुखण्यामुळे निर्माण झालेली शारीरिक अक्षमता यात सुधारणा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांच्या मणक्यांची लवचिकता आणि कॉर्टिकोमोटर एक्झिटेबिलिटी लक्षणीयरीत्या वाढल्याचेही आढळले आहे. या आजाराच्या रुग्णांनी घरी दीर्घकाळ योगाभ्यास करण्याची शिफारस देखील या अध्ययनात करण्यात आली आहे. ही एक विनाखर्चिक उपचारपद्धती आहे, ज्यामुळे वेदना कमी होतातच, पण एकूण जीवनमानात आणि आरोग्यातही सुधारणा होत असल्याचे अभ्यासातून निष्पण झाले आहे.

योग हा फक्त योगासनांपुरताच मर्यादित आहे असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. कारण, त्याचे शारीरिक फायदे सहज लक्षात येतात. परंतु, प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांच्या संयोगामुळे अगणित फायदे होतात. मन, शरीर आणि श्वास यांचे संतुलन राखल्याने जीवनप्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.