yoga

Yoga For Glowing Skin: वय वाढत चालल्यामुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावरील ग्लो कमी होत जातो. त्यासाठी काही क्रिम (Cream) आणि महागड्या वस्तूवर पैसा खर्च केला जातो. ताण तणाव (Stress) वाढल्यामुळे, चुकीच्या रुटीनमुळे, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे व्यक्तीच्या चेहऱ्यां संबंधी समस्या वाढतात. काही वेळा आपलं लाईफस्टाईल हे बिघडतं आणि रुटीनमध्ये धावपळ होते  त्यामुळे शरिरात होणारे हार्मोनल बदल चेहऱ्यावरील सुरकुत्यांबरोबरच मुरुम, कोरडी आणि निर्जीव त्वचा यांचे कारण बनतात. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर ग्लो यावा या करिता, तुमच्या रुटीनमध्ये या ३ योगासने  नक्की समावेश करा.

१.हलासन

हलासन केल्याने शरीरातील रक्त चेहरा आणि डोक्याकडे जाते. त्यामुळे चेहऱ्याची चमक वाढते. तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर  काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी, चमकदार आणि मजबूत बनते.

२. त्रिकोनासन

त्रिकोनासन करतानाही रक्ताचा प्रवाह डोके व चेहऱ्याकडे होतो. त्यामुळे त्वचेला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळू लागतो.  आणि चेहराही उजळतो.हे आसन ताणतणाव दुर होण्यासाठी उपयुक्त ठरतो. आणि चेहऱ्यावर सुरकत्या कमी करण्यासाठी मदत करते.

३. मत्स्यासन

मत्स्यासन करताना व्यक्ती डोक्याच्या मदतीने खांदा आणि कंबर वर करून संतुलन साधते. त्यामुळे रक्ताचा प्रवाह डोक्याकडे सुरू होतो. शरीराला आराम देण्यासोबतच या आसनामुळे चेहराही चमकतो. या आसनाने शरिरात ऊर्जा वाढते.  शरिरातील विषारी घटक या आसनाने बाहेर पडतात, पोटाशी संबंधीत समस्या दूर होतात.