Pigeons

Beware of Pigeon Droppings: तुम्ही जेथे राहता तेथे कबुतर (Pigeons) आहेत का? असतील तर सावधान! कारण, कबुतरांच्या जवळ राहिल्यास तुम्हाला अनेक प्राणघातक रोग होऊ शकतात. कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे तुमचे फुफ्फुस खराब होऊ शकतात. नोव्हेंबर 2023 मध्ये, एका 53-वर्षीय महिलेला कबूतराच्या विष्ठेच्या संपर्कामुळे अतिसंवेदनशीलता न्यूमोनिटिस नावाची जीवघेणी स्थिती निर्माण झाली. परिणामी या महिलेवर फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया (Lung Transplant) करावी लागली. ज्याठिकाणी अनेक कबूतर राहतात. तिथे एक विचित्र वास येतो. या कबुतरांना फक्त त्या ठिकाणी बसणे आवडते जिथे त्यांनी विष्ठा केली आहे. जेव्हा ही विष्ठा सुकते तेव्हा त्याची पावडर बनते. तसेच जेव्हा कबूतर पंख फडफडतात तेव्हा बीट पावडर श्वासाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचते. यामुळे फुफ्फुसाचे गंभीर आजार होतात.

तथापी, जे लोक कबुतराच्या विष्ठा आणि पिसाभोवती राहतात आणि त्यांच्या थेट संपर्कात येतात त्यांना रोगाचा धोका जास्त असतो. पिसांद्वारे पसरणारे जिवाणू आणि विष्ठा श्वासाद्वारे फुफ्फुसात पोहोचतात. यानंतर, हे प्रतिजन शरीरात रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करतात ज्याचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. यामुळे फुफ्फुसांना मोठी हानी होते.  (हेही वाचा - Cancer Deaths in India: भारतामध्ये एका वर्षात कर्करोगामुळे तब्बल 9.3 लाख मृत्यू, समोर आली 12 लाख नवीन प्रकरणे- Lancet Study)

संशोधनानुसार, एक कबूतर एका वर्षात 11.5 किलो विष्ठा करते. विष्ठा सुकल्यानंतर त्यामध्ये परजीवी वाढू लागतात. विष्ठेमध्ये तयार होणारे परजीवी हवेत विरघळून संसर्ग पसरवतात. अतिसंवेदनशीलता न्यूमोनायटिस अतिशय धोकादायक आहे. ज्यामुळे तीव्र असल्यास, श्वास घेण्यात अडचण, खोकला, ऑक्सिजन ड्रॉप, सांधेदुखी अशी लक्षण दिसून येतात. (हेही वाचा: Covid's JN.1 Variant in Maharashtra: 'कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नाही', मात्र कोविड अनुरूप नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे राज्य सरकारचे आवाहन)

हे रोग हिस्टोप्लाज्मोसिस, क्रिप्टोकोकोसिस, सिटाकोसिस, साल्मोनेला आणि लिस्टरिया म्हणून ओळखले जातात. या आजाराची लक्षणे सुरुवातीला अतिशय सौम्य असतात. खोकला, कोरडा खोकला आणि थोडासा श्वासोच्छवासाचा त्रास, हळूहळू वजन कमी होणे, सौम्य ताप आणि अंगदुखी, अशी लक्षण जाणवायला लागतात.